Mahmandwadi to Mahadevwadi : पुण्यातील महमंदवाडीचे नामांतर महादेववाडी होणार ? , मुख्यमंत्र्यांकडून दखल!

CM Shinde Letter to Pune Municipality : पुणे महापालिका आयुक्तांना पाठवले पत्र ; शिवसेना (शिंदे गट) शहराध्यक्ष नाना भानगिरेंनी केली होती मागणी
CM Shinde and Pune Municipality
CM Shinde and Pune MunicipalitySarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यात सत्ताबदल होत असताना काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या, ज्यामध्ये प्रामुख्याने औरंगाबाद आणि उस्मानाबद शहरांचा नामांतरांचा निर्णय ठाकरे सरकारने आपल्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये घेतला होता. त्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने यात थोडा बदल करत औरंगाबाद शहाराचे नाव केवळ संभाजीनगर ऐवजी छत्रपती संभाजीनगर असे ठेवले आणि उस्मानाबादचे धाराशीव असे केले.

त्यानंतर अहमदनगर शहराचे अहिल्यानगर करण्याबाबतही चर्चा झाल्या. मोठ्या शहरांच्या नामांतराचे हे लोण आता उपनगर अन् गावांपर्यंत पोहचल्याचे दिसत आहे.

कारण, आता पुणे शहरातील महमंदवाडीचे महादेववाडी असे नामांतर करण्याची मागणी समोर आली आहे. शिवसेना(शिंदे गट) पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी यासंदर्भात शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांच्याकडे मागणी केली होती.

विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी या मागणीची दखल घेतली असून, महमंदवाडीच्या नामांतरासंबंधी योग्य कार्यवाही करण्याचे पत्र मुख्यमंत्र्यांनी पुणे महापालिका आयुक्तांना पाठविले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर गोगावले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सप्टेंबर महिन्यात पत्र पाठविले होते. त्यामध्ये "महमंदवाडीचे नामकरण महादेववाडी असे करण्यात यावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. त्यामुळे या मागणीचा विचार करावा' असे नमूद केले होते.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी या मागणीची दखल घेत, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना संबंधित मागणीसंदर्भातील बाजू तपासून योग्य कार्यवाही करावी, असे पत्र नुकतेच पाठविले आहे. त्यामुळे आता आगामी काळात महमंदवाडीचे महादेववाडी असे नामांतर होते की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

CM Shinde and Pune Municipality
PMC Covid Scam : चौकशीचा भुंगा कोणाच्या मागे लागणार? 500 कोटी रुपयांच्या निविदांमधील घोळ उघड होणार

""महमंदवाडीचे महादेववाडी असे नामकरण करावे, अशी मागणी आम्ही पक्षाचे प्रतोद भरत गोगावले यांच्याकडे केली होती. त्यांनी यासंबंधी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले. तर मुख्यमंत्र्यांनी देखील आमच्या मागणीची दखल घेऊन महापालिका आयुक्‍तांना अभिप्रायासाठी पत्र पाठविले आहे.'' अशी माहिती शिवसेना (शिंदे गट) शहाराध्यक्ष नाना भानगिरे यांनी दिली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com