Pune News : हिंदूराष्ट्र सेनेच्या नऊ जणांना मरेपर्यंत जन्मठेप : ॲड. निकमांचा युक्तिवाद कोर्टाने केला मान्य!

Pune News : प्रकाशआण्णा गोंधळे खून प्रकरण!
Court
CourtSarkarnama

पुणे: पूर्ववैमनस्यातून माथाडी कामगार नेते प्रकाश नारायण गोंधळे यांचा धारदार शस्त्रांनी वार करून खून केल्याप्रकरणी हिंदू राष्ट्रसेनेच्या नऊ जणांना न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप आणि प्रत्येक २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी हा निकाल दिला. हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते विकी जाधव, वैभव भाडळे, अक्षय इंगुळकर, श्रीकांत आटोळे, अमोल शेगडे, राहुल कौले, विकी पाटील, सूरज फडके आणि आकाश शिंदे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

Court
Bhor Grampanchayat : भोर तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींवर प्रशासकराज!

आठ जुलै २०१३ मध्ये गोंधळे यांचा खून झाला होता. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. जून २०१३ मध्ये गोंधळे यांच्या घरावर हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. हल्लेखोरांनी गोंधळे यांच्या दरवाजावर पेट्रोल टाकून तो जाळला. तसेच घरात घुसत घरगुती वस्तुंचे नुकसान केले होते. या प्रकरणाची फिर्याद गोंधळे हडपसर (पुणे) पोलिस ठाण्यात दिली होती.

खूनाच्या घटनेच्या दिवशी रात्री अकराच्या सुमारास गोंधळे हे नेहमीप्रमाणे रेशनिंग दुकानातून घरी चालले होते. आरोपींनी त्यांना अडवून त्यांच्यावर कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये गोंधळे यांचा मृत्यू झाला होता. याबाबत राजेंद्र पिंगळे यांनी फिर्याद दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर फिर्यादी, साक्षीदार, पंच यांना खटल्यात लक्ष घालू नका, अशा प्रकारच्या धमक्या येत होत्या, अशी माहिती त्यांनी साक्ष दरम्यान दिली. निकाल देताना न्यायालयाने प्रत्येक गुन्हेगाराला २० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाच्या रकमेतून एक लाख ५० हजार रुपये गोंधळे यांच्या कुटुंबीयांना द्यावे, असे आदेशात नमूद केले.

Court
Nana Patole म्हणाले बदला घेण्यासाठी एकत्रित लढा, वंजारींच्या विजयाची पुनरावृत्ती झालीच पाहिजे...

पंच साक्षीदारांवर टाकण्यात आला होता दबाव :

खटल्याचे कामकाज चालू असताना १८ जानेवारी २०२० रोजी फिर्यादी राजेंद्र पिंगळे यांनी फियार्दी साक्ष देऊ नये, म्हणून त्यांचा मुलगा ऋषिकेशपिंगळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात होता. न्यायालयात आलेले पंच आणि साक्षीदारांवर सुद्धा आरोपी आणि त्यांच्या मित्रांकडून दबाव टाकण्यात आला होता. गोंधळे यांच्यावर केलेला हल्ला हा अतिशय क्रूर आहे, असा युक्तिवाद ॲड. निकम यांनी केला. गुन्हा सिद्ध करण्यासाठी ॲड. निकम यांनी एकूण १९ साक्षीदार तपासले. ॲड. निकम यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने सर्व आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com