Pune Crime : पाय धुतलेले पाणी प्या,स्पर्धा परीक्षेत यश मिळवा!

Sting operation : भोंदूगिरी करून युवकाची फसवणूक, स्टिंग ऑपरेशन करून पर्दापाश
Vrishali Dhole Shirsath
Vrishali Dhole Shirsathsarkarnama
Published on
Updated on

Pune : नैराश्य दूर करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी युवकाला औषधोपचार घेण्यापासून रोखून त्याला गंडेदोरे बांधून राख खायला दिली. पाय धुतलेले पाणी प्यायला दिले. अंगी अंतींद्रिये शक्ती असल्याचे भासवून युवकाला मृत्यूची भीती घातली.युवकाची सुमारे दीड लाख रुपयांची फसवणूक करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे.पुण्यातील पाषाणसारख्या उच्चभ्रू भागात कन्सल्टन्सीच्या नावाखाली जादूटोणा करत असलेल्या महिलेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, पोलिस आणि पीडित व्यक्तीने स्टिंग ऑपरेशन करून पर्दापाश केला आहे.

Vrishali Dhole Shirsath
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी सरकार दरबारी हालचालींना वेग; मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक...

वृषाली ढोले शिरसाठ या महिलेने नैराश्य दूर करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी युवकाला औषधोपचार घेण्यापासून रोखून त्याला गंडेदोरे बांधून राख खायला दिली. पाय धुतलेले पाणी प्यायला दिले. अंगी अंतींद्रिये शक्ती असल्याचे भासवून युवकाला मृत्यूची भीती घातली. या प्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात वृषाली संतोष ढोले शिरसाठ (वय - 39, रा. वंशज गार्डन, पाषाण) या महिलेसह साथीदार माया राहुल गजभिये ( वय- 45, रा. विठ्ठलनगर, पाषाण) आणि सतीश चंद्रशेखर वर्मा (वय - ३३, रा. गणेश हॉस्टेल, पाटीलनगर, बावधन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

फसवणूक झाल्याप्रकरणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या पाषाण परिसतील 23 वर्षीय युवकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार जादूटोणा विरोधी कायदा तसेच विविध कलांमखाली गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पुर्णवेळ कार्यकर्ते विशाल विमल (बोपोडी, पुणे) यांना सदर महिला आणि साथीदार हे जादूटोणा, भोंदूगिरी आणि फसवणूक करत असल्याची नोव्हेंबर महिन्यात माहिती मिळाली.

(Edited BY : Roshan More)

महा.अंनिसच्या पुणे शहर शाखेच्या कार्यकर्त्यानी सदर प्रकरणी शहानिशा केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि.१६)विशाल विमल हे पिडित युवक व साध्या वेशातील चतुशृंगी ठाण्याच्या पोलिसांसोबत सदर महिलेच्या पाषाण, मुक्ता रेसिडेन्सी येथील गुरुदत्त कन्सल्टन्सी कार्यालयात उपचारासाठी जात महिलेचा भांडाफोड केला.

पोटाचा विकार झाला...

स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश आल्याने पीडित युवक नैराश्येमध्ये होता. समुपदेशक महिला असल्याची सोशल मीडियावरील जाहिरात पाहून हा युवक संशयित महिला वृषाली ढोले शिरसाठ सप्टेंबर २०२१ पासून उपचारासाठी जात होता. त्याला कोणतीही समस्या न विचारता सदर महिलेने अतेंद्रीय शक्तीने समस्या ओळखल्याचे सांगितले. युवकाचे आयुष्य वयाच्या ३० वर्षापर्यंत आहे असे सांगुन ते वाढविण्यासाठी आलौकीक शक्तीची कृपा असलेला गंडा हातात बांधण्यास व राख खाण्यास दिली. त्याने युवकाच्या घशाला इजा झाली आणी पोटाचा विकार झाला. या महिलेने युवकाचे मित्र आणि नातेवाईक यांनाही शारीरीक व मानसिक आजार बरे करण्यासाठी घेऊन येण्यास सांगून त्यांचीही फसवणूक केली आहे. या प्रकरणी पुढील कार्यवाही चतुशृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव, पोलीस उपनिरीक्षक विद्या पवार करत आहेत.

Vrishali Dhole Shirsath
Congress : काँग्रेस करणार लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा ...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com