Congress : काँग्रेस करणार लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा ...

congress working committee meeting : 21 डिसेंबरला काँग्रेस कार्यकारिणीची बैठक
Congress News
Congress NewsSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : गेल्या महिन्यात पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवा नंतर काँग्रेस आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने 21 डिसेंबरला काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे.

या बैठकीत काँग्रेस 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करू शकते आणि भाजपशी टक्कर देण्यासाठी रणनीती बनवू शकते. पाच पैकी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करणाऱ्या काँग्रेस पुढे लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचे मोठे आव्हान असणार आहे. कारण, इंडिया आघाडीत समाविष्ट असलेले इतर पक्ष आता राज्यांमध्ये जास्त जागांची मागणी करू शकतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Congress News
Amol Kolhe: डॉक्टर, अभिनेता ते खासदार; वाचा अमोल कोल्हे यांचा खासदारकीचा प्रवास...

इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर कॉग्रेसची बैठक

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी कॉग्रेसची बैठक बोलावली आहे. ही बैठक अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याच्या दोन दिवस आधी म्हणजेच १९ डिसेंबरला इंडिया आघाडीची बैठक ही आयोजित केली जाणार आहे.

राहुल गांधींच्या दौऱ्याचा संभाव्य विचार

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत निवडणुकीपूर्वी राहुल गांधींच्या दौऱ्यावर ही चर्चा होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी बेरोजगारी आणि महागाई हा मुख्य मुद्दा बनवून ही यात्रा काढणार आहेत. ही यात्रा डोळ्यासमोर ठेवून पक्ष काम करत आहे. तसेच हा प्रवास पायी करावा की हायब्रीड पद्धतीने करावा, यावरही चर्चा सुरू आहे.

Congress News
Eknath Khadse: खडसे आक्रमक, सलीम कुत्ता प्रकरणी गिरीश महाजनांची एसआयटी ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com