Rupali Chakankar Announced Statistics: विदेशातील नोकरीच्या आमीषाने महिलांची फसवणूक; चाकणकरांनी थेट आकडेवारीच जाहीर केली

State Women Commission News: या महिलांची सुटका करण्याचे आवाहन त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलं आहे
Rupali Chakankar
Rupali ChakankarSarkarnama
Published on
Updated on

Rupali Chakankar News: राज्यातील हजारो महिलांना विदेशात नोकरीचे आमीष देऊन त्यांची फसवणूक केल्याची माहिती काही दिवसांपूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली होती. त्यानंतर त्यांनी आता थेट फसवणूक झालेल्या महिलांची आकडेवारीच जाहीर केली आहे. (Cheating of women with the lure of foreign jobs; Chakankar directly announced the statistics)

विदेशातील नोकरीचे आमीष देऊन राज्यातील सुमारे अडीच हजार महिलांची फसवणूक झाल्याची माहिती चाकणकर यांनी दिली आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधत यासंदर्भात केंद्र सरकारची मदतीने या महिलांची सुटका करावी, अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

Rupali Chakankar
Lalit Kumar Modi Tweet : मोदींकडून नेहरुंचा तो फोटो शेअर ; नव्या वादाला तोंड फुटलं ; काँग्रेस आक्रमक..

चाकणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील तरुण व तरुणींना विदेशातील आकर्षक नोकऱ्यांचे प्रलोभन दिली जातात.या नोकर्‍या खोट्या कॉल सेंटर्स आणि क्रिप्टो-चलन फसवणूकीच्या माध्यमातून ऑफर केल्या जातात. दुबई आणि भारतातील एजंट सोशल मीडियावर जाहिरातीच्या माध्यमांतून नोकऱ्याची आमीष दाखवतात. त्यातून त्यांची फसवणूक केली जाते. राज्यातील जवळपास अडीच हजार महिला या जाळ्यात अडकल्या आहेत.

चांगल्या पगाराच्या अपेक्षेने राज्यातील अडीच हजार महिलांना ओमान देशात नेण्यात आलंय. यात पुणे शहरातल्याही अनेक महिला आहेत. असंही त्यांनी सांगितलं आहे. रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले आहे. त्यांनी या प्रकाराकडे लक्ष वेधत केंद्र सरकारच्या मदतीने त्या महिलांची सुटका करावी, अशी मागणी केली आहे.

Rupali Chakankar
Shinde-Thackeray Politics: उच्च न्यायालयाचा शिंदे सरकारला झटका; 'त्या' निर्णयाला स्थगिती

राज्यात दिवसेंदिवस जाहीर सभांमधून एखाद्या महिलेवर पातळी सोडून भाषा वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यादेखील त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेल्या होत्या. पण त्यांची तक्रार लिहून घेतली नाही. नाईलाजाने त्यांना महिला आयोगाकडे तक्रार द्यावी लागली, हे दुर्दैवी आहे. असे सांगत त्यांनी गृह खात्यावरही नाराजी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com