टिळेकरांना अडचणीत आणण्याची चेतन तुपेंनी साधली संधी...

नव्या प्रभाग रचनेमुळे काही विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग नाहीसे होऊन नवीन भाग जोडला गेला आहे. काही नगरसेवकांना अपेक्षित भाग जोडला गेल्याने हायसे वाटत असून, काहींची अडचण झाली आहे.
Chetan Tupe -Yogesh Tillekar
Chetan Tupe -Yogesh Tillekarsarkarnama
Published on
Updated on

हडपसर (पुणे) : नव्या प्रभागरचनेमुळे हडपसर मतदारसंघात अनेक इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली आहे. खुद्द माजी आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tillekar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा या रचनेवर प्रभाव पडला असल्याचा आरोप करीत मतदार भाजपच्या मागे कायम असल्याने हडपसरमधून आमचेच सर्वाधिक उमेदवार बाजी मारतील, असा दावा केला आहे. तर, हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून तो यापुढेही कायम राहील, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे (Chetan Tupe) यांनी केला. (Chetan Tupe got Yogesh Tillekar in trouble through ward structure)

दरम्यान, भाजपने नव्या प्रभाग रचनेबाबत राष्ट्रवादीवर केलेल्या आरोपांमुळे आमदार चेतन तुपे यांनी भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांना अडचणीत आणण्याची संधी साधल्याची चर्चा मतदारसंघात होत आहे.

Chetan Tupe -Yogesh Tillekar
एकनाथ शिंदे-जितेंद्र आव्हाड जोडीने केले भाजपचे बालेकिल्ले उद्‌ध्वस्त!

नव्या प्रभाग रचनेबाबत भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेचा फायदा घेत गल्लीबोळांच्या आधारावर चिरफाड करून प्रभागरचना केली आहे. यात भौगोलीक सलगतेचा कोठेही विचार केला नाही. भारतीय जनता पक्षाला मिळत असलेल्या जनाधाराला घाबरून प्रभाग रचनेवर राज्य सरकारचा प्रभाव पडलेला दिसत आहे. कितीही उलटसुलट प्रभाग रचना झाली असली तरी मतदार बदललेला नाही. तो कोणत्याही प्रभागात असला तरी आमच्या सोबतच आहे. हडपसर मतदारसंघात कोणत्याही प्रकारच्या प्रभाग रचनेचा भाजपवर काहीही फरक पडणार नाही. आमचे सर्व उमेदवार या कुरघोडीवर निश्चितपणे मात करतील. येत्या निवडणुकीत मतदारसंघात आमचे सर्वाधिक उमेदवार निवडून आलेले दिसतील.

Chetan Tupe -Yogesh Tillekar
विशाल फटेच्या बायकोचे गंठण आणि कानातील रिंगाही पोलिसांकडून जप्त...

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे म्हणाले की, हडपसर मतदारसंघ पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. सध्या मतदारसंघात आमचे अठरा नगरसेवक आहेत. प्रशासनाने प्रभाग रचना त्यांच्या निकषानुसार केली आहे. ती ज्याच्या त्याच्या दृष्टीकोनातून कोठे अनुकूल, तर कोठे प्रतिकूल असू शकते. त्यानुसार आम्हाला उमेदवार द्यावे लागतील. नव्याने समाविष्ट गावांमुळे मतदारसंघातील नगरसेवकांची संख्याही वाढली आहे. त्या जागांसह अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे.

Chetan Tupe -Yogesh Tillekar
प्रभाग रचना जाहीर होताच भाजपच्या १६ नगरसेवकांचा राष्ट्रवादीच्या जगतापांना फोन!

नव्या प्रभाग रचनेमुळे काही विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग नाहीसे होऊन नवीन भाग जोडला गेला आहे. काही नगरसेवकांना अपेक्षित भाग जोडला गेल्याने हायसे वाटत असून, काहींची अडचण झाली आहे. काही प्रभागांत  एकापेक्षा अधिक दावेदार असलेल्या नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. काही नगरसेवकांचे प्रभाग अदृश्‍य झाल्यासारखी स्थिती असून, त्यांचा हक्काचा परिसर दुसऱ्याच कुठल्या तरी प्रभागाला जोडल्याने त्यांची नाराजी व चिंता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com