Pimpri Chinchwad : दोन आठवड्यांत मुख्यमंत्री पुन्हा भोसरीत; महासत्संगासाठी कोल्हापूरहून हेलिकॉप्टरने येणार

Eknath Shinde : ११ लाख भाविक जमणाऱ्या एका दिवसाच्या राष्ट्रीय महासत्संगासाठी मुख्यमंत्री आज येणार भोसरी जवळील मोशीत
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील भोसरी विधानसभा मतदारसंघात मोशी येथे आज एक दिवसाचा राष्ट्रीय महासत्संग होणार असून त्याला ११ लाख भाविक हजेरी लावणार असल्याच दावा आयोजकांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे या सत्संगाला उपस्थिती लावणार असून त्यासाठी ते कोल्हापूरहून हेलिकॉप्टरने येणार आहेत.

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या इंद्रायणी थडी जत्रेच्या समारोपासाठी मुख्यमंत्री दोन आठवड्यांपूर्वीच (२९ जानेवारी) भोसरीत आले होते. त्यानंतर ते पुन्हा भोसरी विधानसभा मतदारसंघात मोशीत आज सायंकाळी साडेचार वाजता येत आहेत.

Eknath Shinde
BJP News : शिवसेनेच्या ‘त्या २० टक्के’ मतांसाठी भाजपचे आक्रमक डावपेच : कार्यकारिणीत ठरली रणनीती

श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आय़ोजित दिंडोरी प्रणित सेवा मार्गचे प्रमुख आणि अखिल भारतीय श्री.स्वामी समर्थ गुरुपीठाचे शिल्पकार गुरुमाऊली अप्पासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत पीआयईसीसी मैदानावर हा राष्ट्रीय महासत्संग होत आहे. त्याला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. ते अप्पासाहेब मोरे यांचे भक्त आहेत.

गेल्याच महिन्यात नाशिक येथे झालेल्या या सत्संगालाही मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. मोशीतील सत्संगापूर्वी ते कोल्हापूर येथील दुसऱ्या अध्यात्मिक कार्यक्रमाच्या तयारीच्या बैठकीला दुपारी उपस्थित राहणार आहेत. कनेरी मठाच्यावतीने १९ तारखेला कोल्हापूरात शोभायात्रा काढण्यात येणार असून त्याच्या तयारीच्या आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे हे मुंबईहून शासकीय हेलिकॉप्टरने जाणार आहेत.

Eknath Shinde
Ravikant Tupkar : तुपकरांनी अंगावर पेट्रोल ओतलं..;पोलिसांच्या वेशात येऊन आत्मदहन..

ती बैठक आटोपून ते हेलिकॉप्टरनेच पुण्याला सत्संगाला उपस्थित राहण्य़ासाठी येणार आहेत. मोशीत सत्संगाला ११ लाख भाविक उपस्थित राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. सत्संगाबरोबरच रोजगार मेळावा आणि आरोग्य शिबिरही तेथे होत आहे.

पन्नास-साठ कंपन्या रोजगार मेळाव्यात सहभागी होणार आहेत. त्याव्दारे 11 हजार बेरोजगार युवक युवतींना विनामूल्य नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तर दोनशे डॉक्टरांचे पथक आरोग्य तपासणी करणार आहे.

Eknath Shinde
Sanjay Raut :"तुमचाही शशिकांत वारीसे करु.." ; संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी..

यावेळी सव्वाकोटी विश्वविक्रमी संख्येत स्तोत्रांचे सामूहिक पठण होणार असल्याचे सत्संगाच्या स्वयंसेवक डॉ.प्राजक्ता देशमुख यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

या सेवा मार्गाच्यावतीने समाजातील अनिष्ट चालीरीती, अंधश्रद्धा, हुंडाबंदी व्यसनाधीनता, गुन्हेगारी, बेरोजगारी अशा विविध सामाजिक प्रश्नांवर उपक्रमाच्या माध्यमातून वेळोवेळी प्रबोधन करण्यात येते.

तसेच पर्यावरण रक्षण, दुर्ग संर्वधन, मूल्यसंस्कार, सामाजिक जबाबदारी व कर्तव्य याबाबत जागरूकता करून समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे प्रयत्न केले जातात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com