Chinchwad Bjp News : कमळ चिन्हासह भाजपच्या 'अब की बार' घोषणेलाही फासले काळे

Political News : पिंपरी महापालिकेतील माजी सत्ताधारी भाजप नगरसेवकाच्या प्रभागात हा प्रकार घडला.
BJP flag
BJP flagSarkarnama
Published on
Updated on

Pimpri chinchwad News : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर चिंचवड येथे १० डिसेंबर २०२२ रोजी शाईफेक झाल्याने खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असतानाच त्यानंतर चिंचवडमध्येच सव्वादोन वर्षांनंतर पुन्हा तसा प्रकार झाला. या वेळी भाजप पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेले कमळ आणि लोकसभा निवडणुकीनिमित्त दिलेल्या 'अब की बार, चारसौ पार' या घोषणेवरही शाईफेक झाली तथा तिला काळे फासले गेले.

भाजपचे (Bjp) माजी नगरसेवक सुरेश भोईर यांच्या प्रभागात (क्र. १८ अ) केशवनगर, चिंचवड येथे हौसिंग सोसायटीच्या भिंतीवर आणि तेथून जवळ अशा दोन ठिकाणी ही शाईफेक तथा काळे फासण्याचा प्रकार झाला. त्याची पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दखल घेताच वेगाने चक्रे हालली.

BJP flag
Loksabha Election 2024: महायुतीचा मोठा डाव; कोल्हेंविरोधात आढळराव नाहीतर 'या' अभिनेत्यालाच मैदानात उतरवणार?

चिंचवड पोलिसांत भोईर यांनी तक्रार दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, हा प्रकार लक्षात येताच भोईर यांनी काळे फासलेल्य़ा 'अब की...'च्या घोषणेवर पांढरा रंग लावला. केंद्र सरकारच्या आदेशानुसार प्रभागात ठिकठिकाणी 'अब की बार..'ची घोषणा पक्षचिन्हासह पेंट केली होती, असे भोईर यांनी सांगितले.

महात्मा ज्याेतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कसे शिक्षण घेतले, याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य चंद्रकांत पाटील (Chandarakant Patil) यांनी २०२२ मध्ये केले होते. त्यानंतर त्यांनी त्याबद्दल माफीही मागितली होती. तरीही त्यामुळे संतप्त झालेल्या समता दलाचा मनोज गरबडे याने मोरया गोसावी समाधी महोत्सव उद्घाटनासाठी चिंचवडला आलेल्या पाटील यांची सुरक्षा भेदून त्यांच्यावर शाई फेकली होती. त्यानंतर काही दिवस ते मास्कगार्ड लावूनच फिरत होते. त्यानंतर चिंचवडलाच त्यांच्या पक्षाच्या घोषणेवर दोन ठिकाणी दोन वर्षांनंतर पुन्हा ही शाईफेक झाली. त्यातील एका ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र काढण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, हा प्रकार घडलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासून शाईफेक केलेल्याचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. उद्या इतर कुठल्या राजकीय पक्षाच्या बाबतीतही ही घटना होऊ नये, म्हणून त्याबाबत पोलिसांत तक्रार दिल्याचे भोईर यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. वैयक्तिक टीका जरुर करा, पण मोदी वा इतर कुणाचे नाव, फोटो नसलेल्या आणि पक्षाचे चिन्ह व घोषणेवर अशी शाईफेक करणे वा तेथे काळे फासणे गैर असल्याचे ते म्हणाले.

(Edited By : Sachin Waghmare)

R

BJP flag
BJP Political News : भाजपची मोठी खेळी; विरोधी पक्षालाच घेतलं सत्तेत, 13 आमदारांमुळे वाढली ताकद

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com