Pimpri Chinchwad: सेवा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आमदार अश्विनी जगतापांनी थेट दिल्लीच गाठली

Ashwini Jagtap : महामार्ग अधिकाऱ्यांनी दाद न दिल्याने चिंचवडच्या आमदार जगतापांनी घेतली थेट केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरींची भेट
Ashwini Jagtap :
Ashwini Jagtap :Sarkarnama

पिंपरी : दुरवस्था झालेल्या पुणे-बेंगलोर महामार्गावरील (देहूरोड बायपास) सेवा रस्त्याची महामार्ग अधिकाऱ्यांसह पाहणी करूनही तो दुरुस्त न झाल्याने स्थानिक नवनिर्वाचित आमदार चिंचवडच्या अश्विनी जगताप यांनी काल थेट दिल्लीच गाठली. केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांनाच साकडे घातले.

चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारीला निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप या २ मार्च रोजी निवडून आल्या. पहिल्यांदाच आमदार होऊन त्यांनी आपल्या कामाची झलक तीन महिन्यांतच दाखवली आहे.

Ashwini Jagtap :
Pune News: अवघ्या काही महिन्यांपूर्वी भाजपात आलेल्या नेत्याच्या नवीन घरी बावनकुळेंची भेट; जुन्या, निष्ठावंतांच्या भुवया उंचावल्या

रुग्णांच्या असंख्य तक्रारी असलेल्या पुणे जिल्हा रुग्णालयाची (औेंध) त्यांनी ६ मार्च रोजी पाहणी करत तेथील डॉक्टरांना फैलावर घेतले. तर, त्यानंतर त्याच महिन्यात सुरु झालेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी अर्थसंकल्पीय अनुदानाच्या चर्चेत भाग घेतला.

दुसरीकडे आमदारकीची दुसरी टर्म असूनही पिंपरी-चिंचवडमधील दुसरे एक अनुभवी आमदार या अधिवशेनात गप्पच राहिले होते. आमदार अश्विनी जगताप यांनी अवघ्या तीन महिन्यांतच आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.

Ashwini Jagtap :
Kumar Ketkar on Patole: कामाची वेळ पाळा नाहीतर 2024 मध्ये...; कुमार केतकरांनी टोचले नाना पटोलेंचे कान

पुणे-बेंगलोर महामार्ग (देहूरोड बायपास) हा चिंचवड मतदारसंघातून जातो. त्या टापूत किवळे-बालेवाडी दरम्यान या महामार्गाच्या सेवारस्त्याची (सर्व्हिस रोड) दूरवस्था झाली आहे. परिणामी वाहतुकीस अडथळा येत आहे. वाहतूक कोंडी आणि अपघातही होत आहेत.

त्यामुळे त्याच्या दुरुस्तीसाठी आमदार जगताप यांनी महामार्ग अधिकारी आणि कंत्राटदाराला घेऊन या टापूची पाहणी केली. मात्र, त्यानंतरही हा सर्व्हिस रोड दुरुस्त झाला नाही. त्यामुळे आमदार जगताप या थेट दिल्लीला गेल्या.

Ashwini Jagtap :
Girish Mahajan and Nashik BJP : प्रभारी नेमणुकीतून गिरीश महाजनांचे अधिकार छाटले ? पालवेंनी केला खुलासा

त्यांनी केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना याप्रश्नी निवेदन दिले. या हायवे दुरुस्तीचे काम लवकर करावे, अशी विनंती केली. त्यावर या सर्व्हिस रोडचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल, असे आश्वासन गडकरी यांनी दिले.

त्यांच्या कामाची पद्धत आणि झपाटा पाहता आता हे काम लवकरच मार्गी लागेल, असे आमदार जगताप यांनी भेटीनंतर सांगितले. दरम्यान, आमदार जगताप आणि नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर या महामार्गावरील सेवा रस्ता दुरुस्तीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com