Chinchwad By-Election :कलाटेंना वीस एक हजार मतं पडतील, मतदार अहंकार स्वीकारत नाहीत ; रोहित पवारांची टीका!

Chinchwad By-Election : "वंचितच्या कार्यकर्त्यांनी विचार करावा..."
Chincwad By-Election : Rohit Pawar :  Rahul kalate
Chincwad By-Election : Rohit Pawar : Rahul kalateSarkarnama

Chincwad By-Election : पुण्यातील चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत वेगवेगळ्या राजकीय घडामोडींना वेग येत आहे. उमेदवारांचा प्रचारही शिगेला पोहचला आहे. राजकीय नेत्यांची एकमेकांवर टीका टिपण्णी होत आहे. शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यांमुळे महाविकास आघाडीच्या गोटात चिंता वाढली आहे. राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कलाटेंवर टीका केली आहे.

Chincwad By-Election : Rohit Pawar :  Rahul kalate
Tushar Kamthe : 'सरकारनामा'चे वृत्त खरे ठरले ; भाजप सोडलेले माजी नगरसेवक कामठे राष्ट्रवादीत

रोहित पवार म्हणाले, "राहुल कलाटे यांची भाषा अहंकाराची आहे. त्यांना वीस एक हजार मते पडतील. मतदार अहंकाराचा स्वीकार करत नाहीत," असा थेट हल्ला रोहित पवारांनी कलाटेंवर केला. ते चिंचवड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी आले होते.

ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांचा प्रचंड मतांनी विजय होईल. जगताप कुटुंबाप्रति लोकांमध्ये सहानुभूती असेल, मात्र लोक भाजपाला मत देणार नाहीत, याउलट राष्ट्रवादीला विजयी करण्याचं वातावरण लोकांमध्ये आहे. अजित पवार यांनी या भागाचा केलेला विकास, इथली जनता विसरली नाही."

Chincwad By-Election : Rohit Pawar :  Rahul kalate
Chinchwad By-Election : 'चिंचवडची लढाई सहानुभूतीच्या नाही तर विकासाच्या लाटेवर : अश्विनी जगतापांची भावना!

"भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे काहीही बोलले ते खरं होणार आहे का? इथे राष्ट्रवादी निवडून येणार आहे, त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनाच झटका बसणार. याआधीही वंचितमुळे अनेक ठिकाणी नुकसान घडून आले आहे. वंचितच्या कार्यकर्त्यांनी याकडेही पाहिले पाहिजे. भाजप हा राज्यघटनेच्या विरोधात वागत आहे," असे ही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com