Chitra Wagh : 'बाबांच्या नादी लागू नका, बाईच्या नादी लागा…', चित्रा वाघ यांनी प्रचारासाठी दिला कानमंत्र

BJP Chitra Wagh Election Campaign : लोणावळ्यात प्रचारासाठी आलेल्या चित्रा वाघ यांनी भाजप महिला कार्यकर्त्यांना घराघरात जात भाजपच्या योजनांचा प्रचार करण्याचा सल्ला दिला. तसेच प्रचाराचा फोकस महिलावर ठेवण्यास देखील सांगितले.
Chitra Wagh
Chitra Waghsarkarnama
Published on
Updated on

Pune News : सध्या राज्यभरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकांमध्ये राज्याचे वरिष्ठ नेतृत्व प्रचारासाठी मैदानात उतरले आहे. मतदारांना वेगवेगळ्या प्रकारे प्रलोभन दाखवली जात आहेत. योजना, निधीचा आश्वासन दिल जात आहे. सोबतच प्रचार सभांमध्ये होत असलेली विधान देखील चर्चेचा विषय आहे. असंच लोणावळा नगरपालिकेच्या प्रचारा दरम्यान भाजप नेत्या आणि आमदार चित्रा वाघ यांनी केलेले विधान सध्या चर्चेचा विषय बनत आहे.

भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी लोणावळ्यात आलेल्या आमदार चित्रा वाघ म्हणाल्या की, 'घरोघरी मुंग्यांसारखे फिरा. मी नेहमी सांगत असते की बाबाच्या नादी लागू नका, बाईच्या नादी लागा. कारण घरात सगळ्यात हुशार कोण तर ती घरची बाई. तिलाच बरोबर माहिती असतं की आपल्या संसारासाठी चांगलं काय आणि वाईट काय?'

'नवरा जरी नेता असला तरी तो घराच्या बाहेरचा नेता. मात्र घरामधला नेता आपण आहे. त्यामुळे आपण फोकस ठेवला आणि बाई आपल्याकडे आली तर सगळं घरदार आपल्याकडे येतं. मोदीजींच्या इतक्या योजना आहेत त्यातील 35 टक्के योजना फक्त महिलांसाठी आहे. ', असे देखील त्या म्हणाल्या.

चित्रा वाघ यांनी महिला कार्यकर्त्यांना संदेश दिला की प्रचारामध्ये त्यांचा फोकस घरातील महिला असली पाहिजे. महिला मतदार जर आपल्याकडे आली तर विजय आपलाच होणार आहे.

Chitra Wagh
Dilip Walse Patil News : दिलीप वळसे पाटलांचे अजितदादांच्या पावलावर पाऊल; नगराध्यक्षांसह 17 सदस्यांच्या विजयानंतर ‘तिजोरी’ उघडणार...

खा मटण...दाबा कमळाचं बटण...

पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, त्यामुळे मी सगळ्या बायकांना सांगते खा कोणाचा पण मटन पण दाबा कमळाचे बटन. निवडणुका सुरू झाल्या की पार्ट्या सुरू होतात. नवरे आपल्याला सांगतात की आज जेवण बनवू नको म्हणजे समजून जायचं की आज पार्टी आहे. पार्टी वरून आल्यानंतर नवऱ्याला कानामध्ये सांगायचं खा कोणाचाही मटण पण दाब कमळाचे बटन आणि दोन तारखेपर्यंत सर्व बायकांनी हे त्यांच्या नवऱ्याच्या कानामध्ये बोलायचं आहे.

Chitra Wagh
Mahadev Jankar : शांघाय झालं...कॅलिफोर्निया झालं...आता दुबईचं गाजर; राजकारण्यांची नुसतीच बोलंदाजी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com