
Pune News : राजकीय नेत्यांमध्ये क्षमता असली की बदल घडतो. त्यासाठी आमचे सरकार येत्या काळात प्रयत्न करणार आहे. येत्या काळात राज्यात चांगले रस्ते, चांगले एअर पोर्ट विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासोबतच लवकरच म्हणजे 2028 पर्यंत अर्थव्यवस्थेचा विस्तार करण्याचा प्रयत्न सरकारचा असणार आहे. त्याचा फायदा सर्वच घटकांचा विकासासाठी होणार आहे. याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांच्या लाडक्या जलयुक्त शिवार योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'सकाळ' माध्यम समूहाच्या 'महाराष्ट्राचे व्हिजन' या कार्यक्रमात महायुती सरकारच्या पुढील 5 वर्षांच्या प्लॅनिंगबाबत भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राज्यात आमचं सरकार आल्यावर विविध कामांना गती आली असल्याचे सांगत येत्या काळात सर्वाना 100 दिवसांचे टार्गेट दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राचा 52 टक्के भाग अवर्षण प्रवण आहे. त्यामधून बाहेर पडण्याची गरज आहे. दुष्काळ हा महाराष्ट्रच्या पाचवीला पुजला आहे. जलयुक्त शिवार योजनेचा पाच वर्षांपूर्वी फायदा झाला. त्या सॊबतच गाळयुक्त शिवार ही यॊजना येत्या काळात सुरूच राहणार आहे.
स्टार्टअप हा शब्द पहिल्यांदाच दहा वर्षांपूर्वी राज्यात आला आहे. इंडिया स्टार्टअपमध्ये आलेली आकडेवारी पाहता महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहोत, हे सर्वांनी मान्य देखील केली आहे. त्याचा फायदा युवापिढीला होत आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. त्यासोबतच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मित होत असल्याने त्याचा फायदा झाला. मुंबई, पुणे या शहरांना त्याचा फायदा होत आहे.
नव्या पिढीला आता स्वप्नं पूर्ण करता येत आहेत. कॉलेजमधील शिक्षण क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. शिक्षण पद्धतीत गेल्या दहा वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बदल केलं जात आहे. कौशल्य विकास मंत्रालय काळाची गरज असल्याने गेल्या दहा वर्षांपूर्वी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती केली आहे. त्याचा फायदा स्कील डेव्हलपमेंटसाठी होत आहे. तंत्रशिक्षण हे प्रत्येक उद्योगाशी संबंधित आहे, त्याचा फायदा होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.