पटोलेंनी सांगितलेला ‘गावगुंड मोदी’ सापडला; पण त्याला घाम फुटला!

Controversy about nana patole and modi : अथक प्रयत्नांनंतर त्या गावगुंड मोदीला पकडले
Nana Patole - Modi
Nana Patole - ModiSarkarnama
Published on
Updated on

भंडारा : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मागच्या आठवड्यात प्रचार संपल्यानंतर काही कार्यकर्त्यांशी बोलताना "मी मोदीला मारूही शकतो, व शिव्याही देऊ शकतो" असे वक्तव्य केले होते. त्यांच्या याच वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यात पडसाद उमटले होते. नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याविरुद्ध अक्षेपार्ह विधान केल्याचे म्हणत भाजपने (BJP) पटोलेंच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याची मागणी केली. नागपूरमध्ये त्यासाठी आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या नेतृत्वात आंदोलन देखील झाले.

मात्र यानंतर नाना पटोले यांनी यु-टर्न घेत "मी देशाच्या पंतप्रधानांविषयी बोललो नाही तर 'मोदी' नावाच्या गावगुंडा विषयी बोललो" असे सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर भाजपने संबंधित गुंड मोदीला समोर आणण्याचे आव्हान पटोलेंना दिले होते. तसेच भंडारा पोलिसांनाही (Bhandara Police) यामुळे गुंड मोदी पकडण्याचे काम लागले होते. मात्र भंडारा पोलिसांनी आता अथक प्रयत्नांनंतर त्या गावगुंड मोदीला पकडले असून चौकशी करून तसा अहवाल वरिष्ठांना पाठविले आहे. (Controversy on narendra modi)

Nana Patole - Modi
मोठी बातमी; राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा, 'या' तारखेला असणार कडक निर्बंध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कथित गावगुंड मोदीची चौकशी सुरु आहे. तसेच या गुंडाचे टोपण मोदी असे आहे. तर त्याचे पुर्ण नाव उमेश प्रेमचंद घरडे असे असून तो लाखनी तालुक्यातही गोंदी गावातील रहिवासी आहे. त्याला दारूचे व्यसन असल्याने त्याची पत्नी व संपूर्ण परिवार नागपूर येथे राहतात. उमेश दोन वर्षांपासून गावातच एकटाच राहतो, दारू पिवून गावकऱ्यांना शिवीगाळ करतो. मात्र असे असले तरी त्याच्या विरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये आतापर्यंत कोणताही गुन्हा किंवा तक्रार दाखल नाही.

'मोदी' पत्रकारांसमोरही अवतरला :

दरम्यान हा गावगुंड मोदी आज नागपूरमध्ये पत्रकारांसमोर देखील अवतरला. काँग्रेस समर्थित वकील सतीश उके यांनी या तथाकथित गावगुंड मोदीला पत्रकारांसमोर आणले. मात्र, पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देताना या मोदीला चांगलाच घाम फुटला. हा गावगुंड मोदी दारू विकतो, पितो आणि त्यातूनच त्याने नाना पटोले यांच्या विरोधात अपशब्द बोलले आणि त्यांच्या विरोधात प्रचार केला, असा दावा अॅड. सतीश उके यांनी केला. अनेक लोकं त्याच्या मागे लागले त्यामुळे तो घाबरून आपल्याकडे आला आणि आपण त्याला माध्यमांसमोर आणल्याचेही उके यांनी सांगितले.

Nana Patole - Modi
पवारांच्या मताशी 'काँग्रेस' असहमत; कोल्हेंचा चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा

तथाकथित गावगुंड मोदी यावेळी म्हणाला, आपण दारू विकत होतो, दारू पितो, पत्नी आपल्याला सोडून गेली. तसेच आपण नाना पटोले यांना दारूच्या नशेत शिव्या दिल्या आणि विरोधात प्रचार केला, त्यामुळे २०२० पासून आपल्याला मोदी असे टोपण नाव पडले. मात्र पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर अर्ध्यावर सोडून या मोदीने अक्षरशः पळ काढला. त्यामुळं खरंच नानांनी उल्लेख केलेला गावगुंड मोदी हाच होता, की तो हाच आहे असे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न होता, असा प्रश्न निर्माण झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com