Atul Benke News : आमदार अतुल बेनकेंच्या भूमिकेमुळे जुन्ररमध्ये संभ्रम; विधानसभेचे संभाव्य प्रतिस्पर्धीही गोंधळात

Junnar News : विधानसभेचे संभाव्य प्रतिस्पर्धीही गोंधळात...
Sharad Pawar, Atul Benke, Ajit Pawar
Sharad Pawar, Atul Benke, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pimpri-Chinchwad News : जुन्नर या उत्तर पुणे जिल्ह्याच्या टोकाकडील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) आमदार अतुल बेनके यांनी पक्षातील कथित फुटीला तीन महिने उलटून गेल्यानंतरही अद्याप ठाम भूमिका घेतलेली नाही. ना शरद पवार ना अजित पवार कुणाबरोबर आहे, हे त्यांनी स्पष्ट न केल्याने जुन्नर (Junnar) तालुक्यातील राजकारणात सध्या संभ्रम आहे. एवढेच नाही, तर त्यामुळे काय पवित्रा घ्यायचा यामुळे बेनकेंचे प्रतिस्पर्धीही गोंधळलेले आहेत.

आदिवासी चौथरा तथा काळा चबुतरा अभिवादन दिनानिमित्त बिरसा ब्रिगेडने आयोजित केलेल्या राष्ट्रीय आदिवासी अधिकार परिषदेसाठी रविवारी (ता.१) शरद पवार हे जुन्नरला जाणार आहेत. त्या कार्यक्रमाची तयारी स्थानिक आमदार म्हणून बेनकेंनी केली आहे. त्याविषयी विचारणा केली असता मी कुठल्या गटात नसून माझी निष्ठा ही पवार कुटुंबाप्रती आहे, असे ते म्हणाले. तसेच पवारसाहेबांच्या या वर्षीच्या नाही, तर गेल्या वर्षीच्याही बिरसा ब्रिगेडच्या या कार्यक्रमाची तयारी केली होती, त्याला हजर राहिलो होतो, उद्याही राहणार आहे, असे ते म्हणाले. अजित पवारही जुन्नरला येणार असून, त्यावेळीही हजर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar, Atul Benke, Ajit Pawar
Wadettiwar On OBC Leaders : ‘लेखी’वर अडून बसलेले ओबीसी नेते ‘तोंडी’वर समाधानी झाले कसे?

खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) अत्यंत विश्वासातील आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील हे दोघेही अजित पवारांबरोबर गेलेले आहेत. तरीही ते जुन्नरला शरद पवारांच्या सभेला जाणार आहेत. त्याला 'सरकारनामा'शी बोलताना मोहिते यांनी आज दुजोरा दिला. त्यांनी व वळसेंनी आपली भूमिका स्पष्ट केली असली, तरी पुणे जिल्ह्यातील बेनके आणि शिरूरचे आमदार अशोक पवार यांचे अद्याप तळ्यातमळ्यात आहे, ते तटस्थ आहेत. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील राष्ट्रवादीचा (NCP) सर्वसामान्य कार्यकर्ता, मात्र संभ्रमावस्थेत आहे. गोंधळलेला आहे.

बेनकेंनी स्पष्ट भूमिका न घेतल्याने जुन्नरच्या राजकारणात सध्या अस्थिरता आलेली आहे. तेथील माजी आमदार शरद सोनवणे यांनाही त्यामुळे निश्चित आणि ठोस भूमिका घेण्यास सध्या अडचण येत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, आगामी विधानसभा आपण लढणार, हे मात्र त्यांनी ठामपणे 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. पण एकूणच राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थिती पाहता कुठल्या पक्षाकडून लढणार हे आताच सांगता येणार नाही, असे पूर्वाश्रमीचे मनसेचे आमदार व सध्या शिंदे शिवसेनेत (Shivsena) असलेल्या माजी आमदार सोनवणेंनी सांगितले.

राष्ट्रवादीकडून ते लढणार असल्याची जुन्नरमध्ये चर्चा असून, त्याविषयी विचारणा केली असता त्यांनी हे उत्तर दिले. बेनके अजित पवारांबरोबर राहिले आणि जागावाटपात ही जागा त्यांना मिळाली, तर सोनवणे हे अपक्ष म्हणूनही रिंगणात उतरू शकतात. तशी तयारी आणि मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काल त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जोरदार शक्तिप्रदर्शन केले. विधानसभा निवडणुकीचा प्रचार ठरतील, अशा चार मोठ्या घोषणा केल्या.

Edited by : Amol Jaybhaye

Sharad Pawar, Atul Benke, Ajit Pawar
Deepak Kesarkar News : गौतमी पाटीलला ज्यांनी नाचवले ते घरी जातील, केसरकर संतापले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com