Praniti Shinde On Maval: राष्ट्रवादीच्या मावळ लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा; प्रणिती शिंदेंचे कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश

Maval Lok Sabha Constituency: मावळ लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे असणार; समजनेवाले को इशारा काफी है, प्रणिती शिंदेचे राष्ट्रवादीला थेट आव्हान
Praniti Shinde On Maval Lok Sabha Constituency
Praniti Shinde On Maval Lok Sabha ConstituencySarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : पुणे आणि मावळ लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या निरीक्षक आणि पक्षाच्या कार्याध्यक्षा, सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी रविवारी या दोन्ही मतदारसंघाचा आढावा घेतला. मावळची पनवेल येथील सकाळी आढावा बैठक घेऊन त्या पुण्यात आणि नंतर पिंपरी-चिंचवडमध्ये मावळच्या दुसऱ्या बैठकीसाठी रात्री आल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ असलेल्या मावळवर त्यांनी दावा ठोकला. एवढेच नाही, तर तेथून काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष डॉ.कैलास कदम यांच्या उमेदवारीचे संकेतही दिले.

मावळ मतदारसंघ निर्माण झाल्यापासून तेथून आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच लढली आहे. गतवेळी २०१९ ला तेथून अजित पवारांचे पूत्र पार्थ हे उमेदवार होते. तिन्ही वेळेला (२००९,२०१४ आणि २०१९) राष्ट्रवादीचा पराभव झाला असल्याने यावेळी तेथे २०२४ ला काँग्रेसने क्लेम ठोकला आहे. राष्ट्रवादीतील फूट तथा बंडामुळे त्यांनी हे धाडस दाखवले आहे.

Praniti Shinde On Maval Lok Sabha Constituency
Praniti Shinde On Loksabha Candidature: सोलापूर लोकसभा उमेदवारीबाबत प्रणिती शिंदे म्हणाल्या...

आगामी निवडणुका राष्ट्रवादीला सोडून शिवसेना आणि काँग्रेसने मिळून लढण्याच्या सुरु झालेल्या हालचालीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसने हा दावा केला आहे, हे विशेष. मावळ आपला (काँग्रेसचा) असेल, ही माझी जबाबदारी आहे, असे शिंदे यांनी मावळच्या घाटावरील पिंपरी, चिंचवड आणि मावळ या तीन विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीत सांगितले.

यावेळी पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष आणि पुरंदरचे आमदार संजय जगताप, कैलास कदम आदी व्यासपीठावर होते. तत्पूर्वी त्यांनी या मतदारसंघाच्या घाटाखालील पनवेल, कर्जत, उरण या तिन्ही विधानसभा मतदारसंघाचा आढावा पनवेलमध्ये सकाळी घेतला.

Praniti Shinde On Maval Lok Sabha Constituency
Sharad Pawar Beed Sabha: धनूभाऊंच्या कार्यकर्त्यांची हवा टाइट; सभेआधीच पवारांना घातले 'आशीर्वादा'चे साकडे

पिंपरी-चिंचवडमधील बैठकीला येण्यास शिंदे यांना अडीच तास उशीर झाला. त्याबद्दल त्यांनी सुरवातीसच माफी मागितली. नंतर मार्गदर्शन करताना मावळ काँग्रेसला मिळाला पाहिजे, ही पक्ष कार्यकर्त्यांची मागणी त्यांनी मान्य केली. त्यावर मतदारसंघ खेचून आणू, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचा प्रयत्नही केला.

त्याचवेळी त्यासाठी स्थानिक मतदार पक्षाकडे वळविण्याची जबाबदारी ही तुमची आहे, असे त्यांनी कार्यकर्त्यांना बजावले. तुमची इच्छा श्रेष्ठींना सांगू, तसा अहवाल देऊ, पण, लोकांचं मत कुठंय, असं ते विचारतील, असे त्या म्हणाल्या. त्यामुळे आपण एकमेकांना मावळ लोकसभा मतदारसंघाचा टास्क देऊ या, असे सांगत त्यांनी थेट राष्ट्रवादीला आव्हान दिले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com