Solapur Political News: सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीने आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाचा ठराव केला आहे. त्यावर आमदार शिंदे यांची प्रतिक्रिया आली असून माझ्या लोकसभा उमेदवारीबाबत कोठेही अद्याप चर्चा झालेली नाही, असे प्रणिती यांनी सांगितले. (Praniti Shinde said about Solapur Lok Sabha candidature...)
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर उमेदवार म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाचा ठराव काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आला आहे. त्याबाबत शिंदे यांनी आज सोलापुरात आल्यानंतर प्रतिक्रिया दिली. आमदार शिंदे म्हणाल्या की, लोकसभा उमेदवारीबाबत कोठेही माझ्या नावाची अद्याप चर्चा झालेली नाही. लोकसभा मतदारसंघाचा राज्यभर आढावा घेण्याचे काम सुरू आहे. त्यासंदर्भातला अहवाल आम्ही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला सोपवणार आहोत.
अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत आमदार शिंदे यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकार हे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले नाही. नुसती आकडेवारी गोळा करण्यात त्यांचा पूर्ण वेळ जातो. महाराष्ट्राला स्थिर सरकार हवे आहे आणि ते केवळ काँग्रेस पक्षाचे देऊ शकतो. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात एक-दोन दिवसांत १८ लोक दगावले तरीही तिथे कोणी लक्ष केंद्रित करत नाही. समृद्धी महामार्गावर अपघात होऊन लोक मरतात पण त्याकडे लक्ष न देता केवळ आकडेवारी जमवण्यात हे सरकार व्यस्त आहे, असा आरोपही त्यांनी केला.
आमदार शिंदे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण वस्तुस्थितीवर न बोलता ते पीआर किंवा मार्केटिंगकडे जास्त वळवतात. देशातील ज्वलंत विषयावर पंतप्रधान कधीही बोलत नाहीत. तुम्ही भाषा कोणतीही वापरा पण ज्वलंत विषयावर बोला. पंतप्रधानांची एक उंची असते. मात्र परदेशात जाऊनही ते देशाची निंदा करतात किंवा प्रत्यक्षात खोटं बोलतात. परदेशात जाऊन ते सांगतात की आमची लोकशाही सदृढ आहे.
राजकारण बाजूला ठेवून स्वातंत्र्यदिन हा सण म्हणून साजरा करायला पाहिजे. आज आपण देशाचा वाढदिवस साजरा करत असताना अत्यंत खंत वाटते की आपल्या देशाच्या एकतेमध्ये, अखंडतेमध्ये फूट पडत आहे. या एकतेला कोणाची तरी नजर लागली किंवा कलंक लागलाय असे वाटते आहे, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.
आमदार शिंदे यांनी सांगितले की, एकीकडे स्वातंत्र्य उत्सव सुरू असताना आपल्याच देशातील एक राज्य जळतंय, महिलांवर अत्याचार होतोय, बेरोजगारी वाढलीय. काही जातीयवादी विचारधारा आपल्या देशाला आतमधून कीड लावण्याचा प्रयत्न करत आहेत. या मातृभूमीने आपल्याला अनेक वर्ष सांभाळलं, आता तिला सांभाळायची वेळ आहे. राजकारणासाठी तिचे तुकडे करणे योग्य नाही. एकीकडे देश जळत असताना लोकसभेमध्ये त्यावर भाष्य करणं गरजेचं होतं. मात्र, लोकसभेत स्वतःच गुणगान केलं. त्यामुळे एवढा अहंकार हानिकारक असतो. मणिपूरमधील व्हिडीओ वायरल कसा झाला याबाबत विचारणा होते. मात्र, अत्याचार कोणी केले याबाबत कोणी बोलत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.