Pune Congress : होमहवन करणे पुणे काँग्रेसला भोवणार? हाय कमांडचे कारवाईचे आदेश

Pune Congress : काँग्रेस भवनमध्ये होमहवन करणाऱ्यांच्या अडचणी वाढणार?
Pune Congress
Pune Congress Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : काँग्रेसला पुन्हा भरभराटीचे दिवस यावे म्हणून पुण्याच्या काँग्रेस भवनमध्ये होमहवन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र आता या प्रकाराची थेट काँग्रेसच्या हाय कमांडने दखल घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस भवनमध्ये होमहवन करणाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

पक्षाची भरभराट व्हावी, यासाठी काँग्रेस भवनमध्ये झालेल्या होमहवन प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश काँग्रेस हायकमांडने नाना पटोले यांना दिला आहे.

काँग्रेसची आज दिल्लीत महत्वाची बैठक पार पडली. यावेळी काँग्रेसची आगामी दिशा कशी असणार याविषयी चर्चा झाली. या बैठकीत सर्व राज्यांचे प्रभारी, प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ नेते यांचा त्यात समावेश होता. या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील प्रश्नांवर देखील चर्चा झाली. मात्र याच वेळी पुण्यातील काँग्रेस भवन मध्ये 11 डिसेंबरला झालेल्या होम हवन प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला.

Pune Congress
सावंतांच्या प्रयत्नातून तीन वर्षानंतर सुरु झालेल्या 'आदिनाथ'ची मोळी टाकायला मुख्यमंत्री शिंदे येणार

या प्रकरणावरून पक्षाला सोशल मीडियावरून ट्रोल करण्यात आले, असे एका नेत्यांने निदर्शनास आणून दिले. तसेच पक्षाकडे याबाबत लेखी तक्रारीही झाल्याचे त्यांचे नमूद केले. त्यानंतर पक्षाचे सरचिटणीस (संघटना) के.सी. वेणूगोपाल यांनी बैठकीतच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना या होमहवन प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. त्यावर पटोले यांनी निरीक्षक नेमून अहवाल सादर करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

Pune Congress
Gram Panchayat election : ग्रामपंचायत निवडणूक; हुतात्मा गटाच्या दोन दशकांच्या सत्तेचा अस्त

त्यामुळे पुण्यातील काँग्रेस भवन मध्ये 11 डिसेंबरला सकाळी 10 ते दुपारी 1 दरम्यान गोपनीय पद्धतीने पहिल्या मजल्यावर होम हवन करण्यात आले होते. पक्षाला भरभराट यावी, या साठी हे होमहवन केले असे काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पुण्यात (Pune) काँग्रेस (Congress) भवनची स्थापना झाल्यापासून 82 वर्षांमध्ये पहिल्यांदाच पक्ष कार्यालयात होमहवन झाले होते. त्यामुळे पक्ष वर्तुळात याबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. दरम्यान, या सर्व प्रकाराची थेट काँग्रेसच्या हाय कमांडने दखल घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस भवनमध्ये होमहवन करणाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com