Pune Congress : "तक्रारी बंद करा, मी काही सूचना पेटी नाही.."; पुणे दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष संतापले, नेमंक काय घडलं?

Congress political crisis Pune : पुणे शहरातील काँग्रेसला (Pune Congress) लागलेलं गटबाजीचं ग्रहण काही केल्या थांबण्याचं नाव घेत नसल्याचं दिसत आहेच. कारण नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुणे दौऱ्यावर असताना देखील अशाच प्रकारची गटबाजी उफाळून आल्याचं पाहायला मिळालं.
Harshwardhan Sapkal
Harshwardhan Sapkal Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 23 Mar : पुणे शहरातील काँग्रेसला (Pune Congress) लागलेलं गटबाजीचं ग्रहण काही केल्या थांबण्याचं नाव घेत नसल्याचं दिसत आहेच. कारण नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुणे दौऱ्यावर असताना देखील अशाच प्रकारची गटबाजी उफाळून आल्याचं पाहायला मिळालं.

मात्र, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून गटबाजीचे सूर उमटू लागल्याची जाणीव होताच नव्या प्रदेशाध्यक्षांनी संताप व्यक्त करत या नेत्यांना समज दिल्याचं समोर आल आहे. प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांची नियुक्ती झाल्यानंतरच पुण्यातील काँग्रेसमधला एक गट पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं.

प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर आता पुणे शहरातील शहराध्यक्ष देखील बदलावा अशी मागणी या गटाकडून करण्यात येत होती. यापूर्वी देखील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शहराध्यक्ष बदलावा यासाठी काँग्रेसमधील एक गट सातत्याने प्रयत्न करत असल्याचं समोर आलं होतं.

मागील प्रदेशाध्यक्षांनी हे प्रयत्न हाणून पडल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ नव्याने प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पुन्हा एकदा या गटाने शहराध्यक्ष बदलासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पुण्यामध्ये असताना थेट शहराध्यक्ष बदलाबाबत बोलता आलं नाही. तरी शहरातील काँग्रेसची (Congress) झालेली वाताहात प्रदेशाध्यक्षच्या पुढे मांडायची आणि शहरातील संघटनात्मक बदल किती आवश्यक आहे याची जाणीव प्रदेशाध्यक्षांना करून देण्याचे प्रयत्न काही नेत्यांकडून करण्यात आले आहेत.

Harshwardhan Sapkal
Shinde Shiv Sena and MNS : खेडमध्ये शिमोगात्सवात शिंदे शिवसेना आणि मनसे आमने-सामने, जुगलबंदीत वाभाडेही काढले

हर्षवर्धन सपकाळ यांनी पहिल्यांदाच पुणे दौरा केला. या दौऱ्या दरम्यान त्यांनी पुणे , पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेतल्या या बैठकांमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. यादरम्यान अनेक पदाधिकाऱ्यांनी तक्रारींचे पाढे वाचायला सुरुवात केली. स्थानिक पातळीवर होत असलेले राजकारण तसेच स्थानिक नेत्यांची अकार्यक्षमता, सुरू असलेली गटबाजी अशा अनेक गोष्टीं प्रदेशाध्यक्षांना सांगण्याचा प्रयत्न पदाधिकाऱ्यांनी केला.

त्यावर संतापलेल्या सपकाळांनी, तक्रारी करू नका, मी काही सूचनापेटी नाही, असं ठणकावलं तसंच मागचं विसरून जा आणि पुढे एकत्र येऊन काम करण्याचा प्रयत्न करा अशी समज देखील त्यांनी संबंधित नेत्यांना दिली. त्यावर संबंधित नेत्यांनी, तक्रारी करत नाही, पण तुम्ही उपाय शोधा, म्हणजे तक्रारी करणार नाही, असं सांगितलं.

Harshwardhan Sapkal
Satish Bhosale : "खोक्या नव्हे, आमचा विठ्ठल"; सतीश भोसलेवरील कारवाई विरोधात आदिवासी समाज आक्रमक, रास्ता रोको करत केली 'ही' मोठी मागणी

तसंच, पक्षाकडून ऐनवेळी बाहेरून येणार्‍यांना उमेदवारी दिली जाते आणि पक्षाचे कार्यकर्ते त्यांचे काम करतात. मात्र नंतर तो नेता पक्ष सोडून जातो, यामुळे पक्षाचे उमेदवारीसाठी पात्र असलेले अनेक काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते उपेक्षित राहतात, असं म्हणत रवींद्र धंगेकर यांचा देखील मुद्दा या बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा या दवऱ्यानिमित्त पुणे शहरातील काँग्रेस मधील गटबाजी चव्हाट्यावरती आल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, पुणे काँग्रेस आणि गटबाजी हे समीकरण वेगळं नाही. फार पूर्वीपासून पुणे काँग्रेसमध्ये गटबाजी पाहायला मिळत आहे. ही गटबाजी अनेकदा काँग्रेसच्या पराभवाचं कारण बनली आहे. असं असलं तरी अनेक नेत्यांना प्रयत्न करून देखील ही गटबाजी रोखण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे नवीन प्रदेशाध्यक्ष ही गटबाजी रोखतील अशीच काहीशी आशा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com