Praniti Shinde on BJP : अदानींच्या उद्योगात हजारो कोटींची गुंतवणूक केलेला चिनी कोण? काँग्रेसने केला थेट सवाल

Pimpri-Chinchwad : प्रणिती शिंदे यांचा भाजपवर हल्लाबोल
Praniti Shinde
Praniti Shinde Sarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : आरएसएसची विचारसरणी ही महिलाविरोधी आहे, भाजप महिलांकडे एक वस्तू म्हणून पाहतो. ही शोकांतिका आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे यांनी आज पिंपरीत केला.

तसेच अदानी उद्योगाच्या शेल कंपन्यात वीस हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून त्यात एक चिनी नागरिक आहे, तो कोण असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याविरोधात पक्षाने देशभर पत्रकार परिषद घेऊन 'जय भारत सत्याग्रह' अभियान सुरू केले आहे. त्यानिमित्त प्रथमच पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या प्रणिती शिंदे यांचा शहर पक्षाध्यक्ष डॉ.कैलास कदम यांनी स्वागत करून सत्कार केला.

Praniti Shinde
Ajit Pawar On Girish Bapat : "खरंतर बापटांना २०१४ मध्येच..." ; अजित पवारांनी सांगितली आठवण !

त्यानंतर त्यांनी केंद्र व राज्य सरकारसह नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली. तसेच राहुल गांधी यांचा बचावही केला. अदानी घोटाळ्याची चर्चा होऊ नये म्हणून भाजप राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप करून लक्ष दुसरीकडे वळवित आहे, असे त्या म्हणाल्या.

राहुल गांधींनी परदेशात देशविरोधी वक्तव्य केल्याच्या आरोपात काहीही तथ्य नाही. तसेच त्यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला असा भाजपाकडून धादांत खोटा आरोप केला जात आहे, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.

Praniti Shinde
Supriya Sule On Sanjay Shirsat : ''...म्हणून शिरसाट यांना सरकार पाठीशी घालतंय का?''; सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल

नीरव मोदी, ललीत मोदी हे ओबीसी समाजाचे नाहीत, असे सांगत भाजप ही ओबीसी समाजाचा संबंध भ्रष्टाचाऱ्यांशी जोडून ओबीसी समाजाचाच अपमान करत आहे, असे त्या म्हणाल्या. राहुल गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी शहर काँग्रेसने सुरू केलेल्या स्वाक्षरी मोहीमेत सही करून त्यांनी आपला पाठिंबा नोंदवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com