Bazar Samiti Election : नीरेत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी; ठाकरे गटाला एकही जागा नाही : आघाडीला युती देणार टक्कर

या लढाईत सुरवातीलाच महाविकास आघाडीचे व्यापारी मतदारसंघातील अनिल माने व राजकुमार शहा असे दोन्ही संचालक बिनविरोध मिळवून सलामी दिली आहे.
Neera Bazar Samiti Election
Neera Bazar Samiti ElectionSarkarnam
Published on
Updated on

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : नीरा (ता. पुरंदर) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरूध्द भाजप शिवसेना (BJP, shivsenaशिंदे गट) युती असा दुरंगी सामना रंगंणार असल्याचे निश्चित झाले आहे. या लढाईत सुरवातीलाच महाविकास आघाडीचे व्यापारी मतदारसंघातील अनिल माने व राजकुमार शहा असे दोन्ही संचालक बिनविरोध मिळवून सलामी दिली आहे. आता महाआघाडी व युतीचे प्रत्येकी सोळा उमेदवार एकमेकांना भिडणार आहेत. (Congress-Nationalist Alliance in Neera Bazar Committee; Thackeray group does not have a single seat)

नीरा बाजार समितीच्या निवडणुकीत ३५ अर्ज शिल्लक असून १०८ जणांनी अर्ज माघारी घेतले. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून इच्छुक जास्त असल्याने अर्जमाघारीसाठी कसरत करावी लागली. त्यांच्यावर लक्ष ठेवून असलेल्या युतीने अंतिम क्षणी सोळा जणांची यादी जाहीर केली. महाविकास आघाडीच्या पॅनेलमध्ये राष्ट्रवादीस दहा जागा, काँग्रेसला आठ जागा मिळाल्या आहे. ठाकरे गटाच्या वाट्याला एकही जागा नसल्याचे दिसून येत आहे.

Neera Bazar Samiti Election
Pandharpur Bazar Samiti : पंढरपुरात मोठा ट्विस्ट : भालके-काळेंची माघार; परिचारकांना अभिजित पाटलांचे आव्हान

दरम्यान, नीरा बाजार समितीच्या निवडणुकीत युतीच्या पॅनेलमध्ये भाजपला सहा, शिवसेनेला (शिंदे गट) आठ, आऱपीआय आठवले गटास एक व शेतकरी संघटनेस एक जागा मिळाली आहे.

Neera Bazar Samiti Election
Bazar Samati Election : जुन्नरमध्ये महाआघाडीत बिघाडी : काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र; ठाकरे गट भाजप-शिंदे गटासोबत

महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनेल

सोसायटी मतदारसंघ

सर्वसाधारण - संदीप सुधाकर फडतरे, अशोक आबासाहेब निगडे, देविदास संभाजी कामठे (काँग्रेस पुरंदर), वामन आश्रू कामठे, शरद नारायण जगताप (राष्ट्रवादी पुरंदर), पंकज रामचंद्र निलाखे, बाळासाहेब गुलाब जगदाळे (राष्ट्रवादी बारामती)

महिला - शाहजान रफीक शेख (काँग्रेस पुरंदर), शरयू देवेंद्र वाबळे (राष्ट्रवादी बारामती)

इतर मागास - महादेव लक्ष्मण टिळेकर (काँग्रेस पुरंदर)

भटक्या विमुक्त जाती जमाती - भाऊसाहेब विठ्ठल गुलदगड (राष्ट्रवादी बारामती)

ग्रामपंचायत मतदारसंघ -

सर्वसाधारण - गणेश दत्तात्रेय होले (राष्ट्रवादी पुरंदर), बाळू सोमा शिंदे (राष्ट्रवादी बारामती)

आर्थिक दुर्बल ः मनिषा देविदास नाझीरकर (काँग्रेस पुरंदर).

व्यापारी मतदारसंघ -

अनिल बबन माने (काँग्रेस पुरंदर), राजकुमार जयकुमार शहा (राष्ट्रवादी पुरंदर)

हमाल तोलारी मतदारसंघ -

विक्रम पांडुरंग दगडे (काँग्रेस पुरंदर)

Neera Bazar Samiti Election
Ambegaon News : मोठी बातमी : वळसे पाटील समर्थक देवदत्त निकमांना राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली; निकम लढण्यावर ठाम

भाजप शिवसेना (शिंदे गट) युती पुरस्कृत पॅनेल

सोसायटी मतदारसंघ -

सर्वसाधारण - पंकज शशिकांत धिवार (आरपीआय पुरंदर), आनंद संजय जगताप, सुरेंद्र भालचंद्र जेधे ( भाजप पुरंदर), शारदा बाळकृष्ण भापकर, बाबुराव दशरथ गडदरे, (भाजप बारामती) बाळासाहेब मारूती बालगुडे (शिवसेना बारामती), प्रवीण बाळासाहेब जगताप (शिवसेना पुरंदर)

महिला - सारिका गणेश थोपटे, सोनाली लहू कामथे (शिवसेना पुरंदर)

इतर मागासवर्ग - दिलीप विठ्ठल गिरमे (शेतकरी संघटना पुरंदर)

भटक्या विमुक्त जाती जमाती - बाळासाहेब अण्णासाहेब खोमणे (शिवसेना बारामती)

ग्रामपंचायत मतदारसंघ -

सर्वसाधारण - दिलीप सदाशिव कटके (भाजप पुरंदर), भारत शांताराम कटके (शिवसेना पुरंदर)

अनुसूचित जाती जमाती - राजेंद्र भुलाजी गद्रे (शिवसेना पुरंदर)

आर्थिक दुर्बल - सुशील बाळकृष्ण ताकवले (शिवसेना पुरंदर)

हमाल तोलारी मतदारसंघ

नितीन लालासाहेब दगडे (भाजप पुरंदर)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com