Bhagat Singh Koshyari : कोश्यारी हे भाजपचे कार्यकर्ते म्हणून राज्यपाल पदावर बसले होते; नाना पटोलेंचा हल्लाबोल

Nana Patole : ''परमवीरसिंहानी शंभर कोटी कोठून आणले, ते भाजपलाच भेटले, त्यांनी परमवीरसिंहाना का लपवले...''
Bhagat Singh Koshyari Nana Patole
Bhagat Singh Koshyari Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : महाराष्ट्रातील महापुरुषांचा वारंवार अपमान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना या पदावरून काल जावे लागले. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पिंपरी-चिंचवडमध्ये बोलताना कोश्यारींवर कडवट टीका केली. ते भाजपचे कार्यकर्ते म्हणून राज्यपालपदावर बसले होते, असा हल्लाबोल त्यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा मेळावा आज चिंचवडमध्ये झाला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याबरोबर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पटोलेंनी राज्यपालांवर आसूड ओढला.

Bhagat Singh Koshyari Nana Patole
Bacchu Kadu : भविष्यवाणी करता आली, तर बघतो; असं का म्हणाले बच्चू कडू?

राज्यपाल म्हणून त्यांनी एक पै ची सुद्धा भुमिका निभावली नाही, असे ते म्हणाले. भाजपने मुंबईचे माजी पोलिस आय़ुक्त परमवीरसिंह यांना का लपवले. परमवीरसिंह यांनी शंभर कोटी रुपये कोठून आणले, ते भाजपलाच भेटले. मात्र, त्याप्रकरणी बळी हा निरपराध तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांचा घेतला. त्यांना दोन वर्षे तुरुंगात डांबून त्यांचे राजकीय आयुष्य संपवले. हा सत्तेचा दुरुपयोग असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.

Bhagat Singh Koshyari Nana Patole
Eknath Shinde News: ''आमदारकीचं तिकीट देऊ नका,मात्र...''; शिंदे गटाच्या नेत्याचं मुख्यमंत्र्यांसमोरच सूचक विधान

आमची सत्ता आली, तर दाऊदला फरफटत आणू असे सांगणाऱ्या भाजपने केंद्रात सत्तेत येण्यासाठी दाऊदच्या नावाचा वापर केला, असा आरोपही त्यांनी केला. बेरोजगारी, महागाई आणि ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था य़ावर या पोटनिवडणुकीत भर राहणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

Bhagat Singh Koshyari Nana Patole
Bacchu Kadu : भविष्यवाणी करता आली, तर बघतो; असं का म्हणाले बच्चू कडू?

कोकणातील पत्रकाराचा झालेला अपघाती मृत्यू (खून?) हा संविधान आणि घटना धोक्यात आणणारा असल्याचे ते म्हणाले. चिंचवड निवडणुकीत मतविभागणीचा प्रयत्न काही शक्तींनी केला असून त्या कोण हे निवडणूक संपल्यावर सांगणार आहे, असेही ते म्हणाले. तर, ज्यांचं खोक्यावर लक्ष आहे, त्यांना मुंबईचा विकास बघवत नाही, असे शरसंधान आदित्य यांनी यावेळी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com