Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस अन् दरेकरांचं षडयंत्र! पण त्यांच स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, जरांगे पाटील असं का म्हणाले?

Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाबाबत आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे.
Manoj Jarange Patil, Devendra Fadnavis
Manoj Jarange Patil, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News : मराठा आंदोलकांकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन करून मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करण्यात येत आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, काल रॅली दरम्यान अचानक दम लागल्यासारखं झालं. चक्कर आल्यासारखं वाटत होतं. आता देखील बीपी लो आहे. डॉक्टरांनी उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. सायंकाळी परत cएकदा नगर येथे उपचार घेईल.

अंग पूर्ण गळून गेला असून पाठीमध्ये आणि कमरेमध्ये चमका येत आहेत. डॉक्टरांनी पाच-सहा दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र नगर नाशिकचा दौरा नियोजित असून तो दौरा पूर्ण करणार असल्याचं जरांगे यांनी सांगितला.

छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना 288 जागा लढून आठ तरी जागा निवडून आणाव्यात असं वक्तव्य केला आहे. त्याबाबत बोलताना जरांगे म्हणाले, मी आता भुजबळ यांना सिरीयस घेत नाही.

त्यांचं सगळं बोलणं हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिकवलेलं बोलणं आहे. त्यांना फक्त दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचे आहे. त्यामुळे त्यांना आम्ही जास्त महत्त्व देत नसल्याचं जरांगे म्हणाले.

ओबीसी मोर्च्यांबाबत बोलताना जरांगे म्हणाले, हे मोर्चे आता हटकून निघत आहेत. समाजाचा जागृतीसाठी, हक्कासाठी मोर्चे काढले पाहिजेत मात्र ते हटकून काढणं योग्य नाही. त्यांना आरक्षण असून ते लढायला लागले असतील तर आम्ही आरक्षण नसताना किती ताकतीने लढू आता मराठा घराघरातून बाहेर पडला आहे.

पुणे जिल्ह्याने तर रेकॉर्ड मोडून काढले आहेत. समाजासाठी मुलांसाठी समाज बाहेर पडला आहे. त्याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. अनिल बोंडे यांनी जरांगे मुख्यमंत्री झाले तरी संगे सोयरे चा आरक्षण मिळू शकत नाही. वक्तव्य केलं होतं. त्यावरती बोलताना जरांगे म्हणाले आम्ही अनिल बोंडे, छगन भुजबळ यांच्यासारख्यांना गिनत देखील धरत नाही.

Manoj Jarange Patil, Devendra Fadnavis
Manoj Jarange Patil : हाताला सलाईन, कमरेला पट्टा अन्...; मनोज जरांगे पुणेकरांशी बसूनच बोलले

शरद पवार यांच्या घरासमोर काही मराठा आंदोलक आंदोलन करत आहेत. याबाबत बोलताना जरांगे म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि दरेकरांचं षडयंत्र, अभियान आणि सापळा असून मराठा समाज एक झालेला आहे.

त्याच्यामध्ये फूट दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीस यांचं हेच स्वप्न आणि धडपड आहे की मराठ्यांमध्ये फूट दाखवायची. पण मराठ्यांमध्ये फूट पडणार नाही आणि देवेंद्र फडणवीस यांचा स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही असं जरांगे म्हणाले.

सरकारने आरक्षण न दिल्यास विधानसभेच्या 288 जागा लढवणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं.ते पुढे म्हणाले, आमच्या विचाराच्या राखीव सगळ्या जागा आम्ही निवडून आणणार आहे. आणि बाकीच्या जागांवर सर्व जाती-धर्माचे लोक आम्ही देणार आहोत. हे पहिल्यांदा होणार असून सर्वसामान्यांची लाट आली आणि सर्वसामान्य देणारे बनले असं 75 वर्षात पहिल्यांदा घडणार आहे.

Manoj Jarange Patil, Devendra Fadnavis
Manoj Jarange : उमेदवार पाडायचं की उभं करायचं 29 ऑगस्टला ठरविणार; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

पुण्यातील मराठा आंदोलना दरम्यान मनोज जरांगे पाटील यांचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले होते. याबाबत बोलताना जरांगे म्हणाले, मी मुख्यमंत्री होणार नाही. समाजाची भावना असू शकते मात्र मला त्याचा नाद नाही. समाजाला लुटून मी मोठा होणार नाही. सर्व समाजातील सामान्य लोकांना देणारा बनवणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com