Maharashtra Political News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्यासाठी पुण्यातील शांतता रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर झालेल्या सभेत त्यांनी काही वेळ उभे राहून तर काही वेळ बसूनच संवाद साधला. पुण्यातील संपूर्ण रॅलीत त्यांची प्रकृती ठीक नव्हती.
जरांगेच्या कंबरेला पट्टा होता. हाताला सलाईनची सुई होती. अशा अवस्थेत त्यांनी आर्धा तास कंबरेला हात लावून उभे राहून उपस्थितांशी संवाद साधला. त्यानंतर उभे राहणे शक्य नसल्याने त्यांनी बसूनच समाजाशी संवाद साधला. तासभर भाषण केल्यानंतर जरांगेंनी आपले डोकेही दाबले.
साताऱ्यातील सभेत जरांगे पाटील Manoj Jarange यांना भोवळ आली होती. त्यावेळी त्यांनी तासभर भाषण केल्यानंतर आहे त्या जागेवर स्टेजवर बैठक मांडली. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर आज त्यांची पुण्यात शांतता रॅली पार पडली.
या यात्रेतही जरांगे गाडीवर बसूनच होते. त्यावेळी त्यांनी सध्या मी मरण यातना भोगत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर सभेत ते अर्धातास उभे राहून बोलले. त्यानंतर मात्र त्यांना अशक्तपणाने खाली बसले.
जरांगे पाटील म्हणाले, पुण्यातील गर्दी पाहून अर्ध मंत्रिमंडळ झोपणार नाही. त्यांच्याशी जुळवून घेऊ असे म्हणतील. विरोधकांना दुःख आहे, मी फुटत नाही. त्यामुळे त्यांच्यापुढे मला गोळ्या घातल्याशिवाय पर्याय नाही.
मेलो तर चालेल मला जात महत्वाची आहे, समाज महत्वाचा आहे. या समाजासाठी काहीतरी करायचे आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटत नाही, असा निर्धारही त्यांनी केला.
राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपमधले नेते आरक्षणा विरोधात बोलत आहेत. छगन भुजबळ Chhagan Bhujbal एकटे आहेत. पण ते आरक्षणाला विरोध करत आहेत. भुजबळ यांनी महाराष्ट्र सदन, तेलगी घोटाळा केला. मराठा आरक्षण भुजबळ यांनी खाल्लं आहे.
भुजबळ हे मराठ्याने मोठं केलं आणि आता त्यांच्याच अन्नात विष कालवत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी समनव्यक फोडले. देवेंद्र फडणवीस यांच्या नादी लागून नका, नाही तर तुमचा कार्यक्रम करू, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मराठा समाजाने राजकारण्यांना खूप मोठे केले आहे. त्यांच्या वीस पिढ्या बसून खातील. मात्र आज जात संकटात असताना तुम्ही सरकारच्या सोबत उभे राहात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठ्यांना आवाहन आहे की घरात बसू नका, बाहेर पडा. नुकसान झालं तर चालेल पण एक दिवस आंदोलनात सहभागी व्हा. मराठ्यांनो ताकदीने एकजूट व्हा, असेही ते म्हणाले.
आगामी विधानसभेत बरेच जण पडणार आहेत. ज्यांनी मराठा समाजाला त्रास दिला आहे. त्यांना निवडून येऊ देणार नाही. समाजाच्या शक्तीपूढे कुठलीच सत्ता टिकत नाही. आता 29 ऑगस्टला अंतरवाली येथे एक बैठक ठरवली आहे. त्यावेळी पाडायचे आणि उभे करायचे यावर चर्चा करून ठरवू.तोपर्यंत राज्यात शांतता राहू द्या. त्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, त्यांचा हेतू सफल होऊ देऊ नका. असेही आवाहन जरांगेंनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.