पॅरिसच्या धर्तीवर बारामतीत 'सिटी सेंट्रल' चौक; शहराच्या वैभवात पडणार भर

Baramati : या चौकाच्या बांधकामास सुरुवात झाली आहे
Baramati
Baramatisarkarnama
Published on
Updated on

बारामती : राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, कला व क्रीडा अशा क्षेत्रात बारामती (Baramati) अग्रेसर आहे. त्यामुळे भविष्यात शहरामधील वाहतूक व्यवस्थाही सक्षम असावी, यासाठी पॅरिसमधील 'सिटी सर्कल'च्या धर्तीवर बारामतीत 'सिटी सेंट्रल' प्रकल्पाची उभारणी सुरु झाली आहे.

सिटी सेंट्रल प्रकल्पाच्या कामाची सुरुवात आजपासून झाली आहे. बारामती नगरपरिषदेच्या समोर असलेल्या तीन हत्ती चौकामध्ये सिटी सेंट्रल सर्कलची उभारणी केली जाणार आहे. यामुळे बारामतीची एक वेगळीच ओळख निर्माण होणार असून, बारामतीच्या वैभवात मोठी भर पडणार आहे.

Baramati
Uddhav Thackeray : सरनाईक भाजपच्या 'लॉण्ड्री'त आले, वेळेत कपडे धुऊन देण्यासाठी सरकारला घाई !

ग्रामीण भागातील सर्वात वेगाने विकसित होणारे शहर म्हणून बारामतीकडे पाहिले जाते. शहरात सरळ रुंद रस्ते, बाह्यवळण, दिवा-बत्तीची व सांडपाण्याच्या सोय, उद्याने, ग्रंथालय, वनस्पतिउद्यान व स्मारके आदींची उभारणी करण्यात आली आहे. शहरामधील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने पॅरिस शहरातील 'सिटी सर्कल'च्या धर्तीवर 'सिटी सेंट्रल'ची उभारणीचे काम सुरु झाले आहे.

Baramati
केंद्र सरकारने पळवलेला महाराष्ट्र अँटोबायोटीक कंपनीचा निधी परत मिळणार का ?

हा प्रकल्प उभारल्यानंतर नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार नाही. जलद वाहतूक सेवेच्या उद्देशाने सिटी सेंट्रल प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या सर्कलपासून शहराच्या चारही दिशांना जाण्यासाठी प्रशस्त रस्त्यांची बांधणी होणार आहे. त्यामुळे भविष्यात शहरात आणखी चांगले उद्योगधंद्यांचे येण्यास मतद होणार असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com