IAS Pooja Khedkar : IAS अधिकारी पूजा खेडकरांनी अपंगत्वाचं सर्टिफिकेट रेशनकार्ड दाखवून मिळवलं; विजय कुंभारांचा आरोप

Trainee IAS Officer Pooja Khedkar : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी यूपीएसएसीची परीक्षा देण्यासाठी राज्य सरकारकडून मिळविलेल्या नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेटची चौकशी आता अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरु केली आहे. त्याचा अहवाल केंद्र सरकारला दिला जाणार आहे.
Pooja Khedkar- Vijay Kumbhar
Pooja Khedkar- Vijay KumbharSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आपल्या चुकीच्या कारभारामुळे चर्चेत आलेल्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी रेशनकार्ड दाखवून आपलं अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळविले असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून (वायसीएम) खेडकर यांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळविल्याचे समोर आले आहे. हे सर्टिफिकेट काढताना त्यांनी आपली संपत्ती देखील लपविल्याचा आरोप कुंभार यांनी केला.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या वर्षी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून पूजा खेडकर यांची राज्य सरकारने नियुक्ती केली होती. मात्र आपल्या प्रशिक्षणाच्या काळात केलेल्या अवास्तव मागण्या आणि उद्योगांमुळे खेडकर गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. यूपीएससीची (UPSC) परीक्षा देतानाही त्यांनी अनेक चुकीची कागदपत्रे दिली असल्याचा प्रकार समोर आला आहे.

त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचे वार्षीक उत्पन्न काही लाखांच्या घरात असतानाही खेडकर यांनी नॉन क्रिमीलेअर दाखल्याच्या माध्यमातून फायदा घेतल्याचे समोर आले आहे. याबरोबरच त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी गेल्या वर्षी आपल्याकडे असलेल्या पिस्तुलच्या धाकाने मुळशीमधील शेतकऱ्यांना दमदाटी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Pooja Khedkar- Vijay Kumbhar
Pooja Khedkar : IAS अधिकारी पूजा खेडकर यांना मोठा दणका! जिल्हा प्रशिक्षण तत्काळ थांबवलं

प्रशिक्षणार्थी आयएएस (IAS) अधिकारी पूजा खेडकर यांनी यूपीएसएसीची परीक्षा देण्यासाठी राज्य सरकारकडून मिळविलेल्या नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेटची चौकशी आता अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरु केली आहे. त्याचा अहवाल केंद्र सरकारला दिला जाणार आहे. त्यासाठी खेडकर कुटुंबियांनी इन्कम टॅक्स विभागाकडे भरलेले विवरण पत्र तसेच इतर सर्व माहिती इन्कम टॅक्स विभागाकडून मागविण्यात आली आहे. तसेच स्वतः पुजा खेडकर यांच्या नावावर असलेली प्रॉपर्टी त्यामधून त्यांना मिळत असलेले उत्पन्न याची देखील माहिती घेतली जात आहे.

पूजा खेडकर यांनी नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट काढताना आपल्या संपत्तीची माहिती लपवून हे प्रमाणपत्र काढले. तसेच रेशनकार्ड दाखवून त्यांनी वायसीएम हॉस्पिटलमधून अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेतले असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. याची संपूर्ण चौकशी केली जावी, अशी मागणीही कुंभार यांनी केली आहे.

वादग्रस्त ठरलेल्या पूजा खेडकर यांच्यावर अनेक आरोप केले जात असल्याने त्याची शहानिशा करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने एक समिती स्थापन करण्यात आली आहे.अतिरिक्त सचिव दर्जाचे अधिकारी ही चौकशी करत असून यासाठी ज्या कार्यालयाकडून खेडकर यांनी ही कागदपत्रे घेतली त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतली जात आहे.

Pooja Khedkar- Vijay Kumbhar
Video IAS Pooja Khedkar : IAS पूजा खेडकर प्रकरणात पोलिस महासंचालकांनी घातले लक्ष, दिले मोठे निर्देश !

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी एका मुलाखतीमध्ये आपले आई वडील एकमेकांपासून विभक्त झाल्याचे सांगितले होते. त्यांनी आई-वडील विभक्त झाल्याचे तांत्रिकदृष्ट्या दाखविले असले तरी या दोघांचे उत्पन्न तपासले जात आहे. तसेच पूजा खेडकरांच्या नावावर देखील कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. या मालमत्तेपासून त्यांना किती उत्पन्न मिळते याचा शोध देखील सध्या घेतला जात असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com