दौंड राष्ट्रवादीतील धूसफुस चव्हाट्यावर; रमेश थोरातांच्या समोरच आरोप-प्रत्यारोप...

NCP : प्रत्येक खत पिशवीमागे संघाने १०० रूपये नफा काढला असल्याचे यावेळी प्रश्न उत्तरात उघडकीस आले.
ncp
ncpsarkarnama

केडगाव : दौंड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाच्या कामकाजाचे वाभाडे काढण्यात आले. अहवालात इमारत खर्चापोटी ३६ लाख रूपये दाखविण्यात आले. इमारत दाखवा अन्यथा चुक कबूल करा, असा पवित्रा यावेळी सभासदांनी घेतला.

यावेळी २०२१-२२ ताळेबंद नामंजूर करण्यात आला. माजी आमदार रमेश थोरात यांच्या उपस्थितीत आऱोप प्रत्यारोप झाल्याने दौंड राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) धूसफुस चव्हाट्यावर आली आहे. आजघडीला संघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. (Ncp Latest News)

ncp
जयंत पाटलांचेही पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट ,भाजप आमदार लांडगेंचं केलं सांत्वन...

संघाची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हा बँकेचे संचालक व माजी आमदार रमेश थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आज केडगाव येथे पार पडली. सभा दिड तास चालली. संघाचे व्यवस्थापक सुहास रूपनवर यांनी अहवालवाचन केले. तीन वर्षापुर्वी बांधलेल्या इमारतीचा खर्च चालू ताळेबंदात दाखविण्यात आला आहे. हा खर्च बोगस असल्याचा मुद्दा नानासाहेब जेधे व संघाचे माजी अध्यक्ष पाराजी हंडाळ यांनी उपस्थित केला.

संचालक लक्ष्मण दिवेकर व उद्धव फुले यांनी या मुद्याला विरोध केला. संघाला सहा लाख रूपये नफा झाल्याचे दाखविण्यात आले आहे. हा नफा ओढून ताणून दाखविण्यात आल्याचे जेधे यांनी नमूद केले. तर संघाने पुणे जिल्हा बँकेकडून अडीच कोटी रूपयांची सीसी घेतली आहे. आज संघात खताचे एक पोते शिल्लक नाही. संघाने अडीच कोटी रूपये सीसीचे काय केले ते सभासदांना समजले पाहिजे. अशी मागणी हंडाळ यांनी केली. खर्च ज्या त्या वर्षातच दाखवले पाहिजेत असा मुद्दा भाऊसाहेब टेंगले यांनी मांडला.

ncp
ममता बॅनर्जींना उच्च न्यायालयाचा मोठा झटका; 'दुआरे राशन' योजना ठरवली बेकायदेशीर

विद्यमान संचालक राजेंद्र बु-हाडे म्हणाले, गेली आठ महिने संघाचे १५ पैकी नऊ खत डेपो बंद आहेत. शेतक-यांची खतांमुळे अडचण होत आहे. संघाचे माजी अध्यक्ष सुभाष बोत्रे म्हणाले, संचालक मंडळ व कर्मचारी काहीही उत्तरे देत आहेत. म्हणजे आम्हाला काही कळते की नाही. ताळेबंदात चार लाख ९२ हजार रूपयांचे मोटार भाडे दाखविण्यात आले आहे, ही गंभीर बाब आहे.

राजेद्र शेळके म्हणाले, मी संघाचा मोठा ग्राहक आहे. मात्र संघाच्या गलथान कारभारामुळे मी येथून खते घेणे बंद केले आहे. रमेश थोरात जसे बँकेवर बारीक लक्ष ठेवता तसे संघावर लक्ष ठेवा.भिवाजी गरदडे म्हणाले, ताळेबंदात फ्रॅाड नाही. बेरजा चुकत आहे. त्यावर पाराजी हंडाळ यांनी जोरदार आक्षेप घेत फ्रॅाड असल्याचे नमूद केले. हंडाळ म्हणाले, संघाला ९१ लाख रूपयांचा तोटा असून ब्रम्हदेव आला तरी संघ चालू शकत नाही. संघाचे विद्यमान अध्यक्ष अशोक नरूटे यांनी संघाला सहा लाख रूपयांचा नफा झाला असून खते व औषधे एमआरपीप्रमाणे विकण्यात आली आहेत. व्यवस्थापक सुहास रूपनवर यांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने सभासदांचे समाधान झाले नाही.

ncp
PCMC Politics| पिंपरी महापालिकेत बाहेरच्यांनाच किंमत...

रमेश थोरात म्हणाले, माझ्या नेतृत्वाखाली सर्व संस्था उत्तमरितीने चालू आहेत. मात्र संघाबद्दल फार तक्रारी आहेत. आगामी काळात यात सुधारणा करणे गरजेचे आहे. जो दोषी आहे त्याला मी पाठिशी घालणार नाही. माझ्याकडे पाहून गप्प बसू नका. जे आहे ते उघडपणे मांडत चला. पुणे जिल्हा बँकेत ईडीवाले, सीबीआयवाले पण काहीही सापडले नाही. इतका पारदर्शी कारभार आहे. यावेळी सयाजी ताकवणे, रामभाऊ टुले, नितीन दोरगे, भिवाजी गरदडे, रामभाऊ रूपनवर, झुंबर गायकवाड, धोंडिबा शेळके, अनामिका भापकर, रामचंद्र चौधरी आदी उपस्थित होते.

दरम्यान, संघाने अहवाल काळात खत विक्री केली. त्यात प्रत्येक खत पिशवीमागे संघाने १०० रूपये नफा काढला असल्याचे यावेळी प्रश्न उत्तरात उघडकीस आले. याबाबत उपस्थित सर्वांनीच नाराजी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com