Swabhimani Shetkari Sanghatna News : स्वाभिमानीची डेड लाईन, तुपकरांपर्यंत निरोपच नाही...

Buldhana News बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शेट्टी यांनी परस्पर बैठक घेतल्याने तुपकर नाराज आहेत. त्यांनी राजू शेट्टी यांच्यवर आरोपही केले आहेत.
Ravikant Tupkar, Raju Shetty
Ravikant Tupkar, Raju Shettysarkarnama

Swabhimani Shetkari sanghatna Crisis : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना त्यांचे म्हणणं मांडण्यासाठी १५ ऑगस्टची डेडलाईन दिली आहे. मात्र, याचा निरोपच त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे सूचना आल्यास सर्व म्हणणं मांडू, शेतकरी चळवळ टिकवण्यासाठी माझा लढा आहे. त्यामुळे मी मागे हटणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

बुलडाणा Buldhana जिल्ह्यात नुकताच शेतकऱ्यांचा मोर्चा झाला. या मोर्चासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी Raju Shetty हे आले होते. परंतु या मोर्चात रविकांत तुपकर Ravikant Tupkar सहभागी झाले नाहीत. ते मोर्चाच्या ठिकाणी आले नाहीत. त्यामुळे तुपकर यांची नाराजी उघड झाली.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शेट्टी यांनी परस्पर बैठक घेतल्याने तुपकर नाराज आहेत. त्यांनी राजू शेट्टी यांच्यावर काही आरोपही केले. याबाबत मंगळवारी पुण्यात शिस्तपालन समितीची बैठक झाली. या बैठकीला तुपकर यांना बोलावले होते मात्र ते आले नाहीत.

आता या समितीने तुपकर यांना म्हणणे मांडण्यासाठी 15 ऑगस्टपर्यत मुदत दिली आहे. या कालावधीत तुपकर यांनी म्हणणं मांडाव अशी सूचना या समितीने दिली आहे. या समितीत प्रकाश पोकळे, सावकार मादनाईक, संदीप जगताप, सतीश काकडे हे आहेत. तुपकर आपल्यावर गैरसमजातून आरोप करत असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

Ravikant Tupkar, Raju Shetty
Raju Shetti On Ravikant Tupkar: "मी काय चूकीची भूमिका घेतली ?" | Swabhimani Shetkari Sanghtna

याबाबत तुपकर यांच्याशी संपर्क साधला असता तुपकर यांनी अशाप्रकारची कोणतीही सूचना मिळालेली नाही. सूचना आल्यास आपण सर्व म्हणणं मांडू. शेतकरी चळवळ टिकवण्यासाठी माझा लढा सुरू आहे. त्यामुळे मी मागे हटणार नाही.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com