कोरोना रुग्ण घटले; मात्र, मृत्यूच्या आकडेवारीने वाढवली चिंता

राज्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
corona
coronasarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : डिसेंबरच्या शेवटास आलेली कोरोनाची (Corona) तिसरी लाट जानेवारीपासून तीव्र झाली. मात्र, आता गेल्या काही दिवसांपासून ती ओसरू लागली आहे. चार हजाराच्या घरात गेलेली दररोजची शहरातील रुग्णसंख्या हजाराच्या आत आली आहे. मात्र, दुसरीकडे या रुग्णांचे मृत्यू वाढल्याने ती चिंतेची बाब ठरली आहे. शनिवारी (ता.५) शहरात कोरोनाने पाच बळी घेतले. तिसरी लाट सौम्य असल्याचे एकीकडे सांगण्यात आले असले, तरी दुसरीकडे शहरातच नाही, तर राज्यातही मृत्यू वाढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

शनिवारी शहरात ८४६ नवे कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णसंख्या नऊ हजार २९ वर गेली. त्यातील तब्बल आठ हजार ७५१ हे गृह विलगीकरणात आहेत. तर, फक्त २७८ म्हणजे फक्त तीन टक्के रुग्णच रुग्णालयात दाखल आहेत. आज एकही ओमीक्रॉनचा (Omicron) रुग्ण नव्याने आढळला नाही, ही दिलासा देणारी बाब ठरली. मात्र, त्याचवेळी पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे बळींचा एकूण आकडा हा चार हजार ५८५ झाला. तिसरी लाट नव्या वर्षापासून तीव्र झाली. मात्र, मृत्यूचे प्रमाण कमी असल्याने दिलासा मिळाला होता.

corona
700 शेतकऱ्यांच्या मृत्यूचा परिणाम निवडणुकांमध्ये भाजपला दिसेल

तीन आठवडे काहीशी तशीच स्थिती होती. मात्र, नंतर मृत्यू होऊ लागले. आता दिवसागणिक त्यात वाढ होत चालली आहे. या महिन्याची सुरवातच (ता.१) कोरोनाचे तीन रुग्ण दगावून झाली. काल (ता.४) एक हजार १८० नव्या कोरोना रुग्णांची शहरात नोंद झाली. तर, चारजणांचा बळी गेला होता. परवा (ता.३) एक हजार ८४ कोरोना रुग्ण शहरात आढळले आणि चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर, दोन तारखेला १६९६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद होऊन तिघांचा बळी गेला होता.

corona
राजेशाही असती तर त्यांना हत्तीच्या पायाखाली चिरडले असते : उदयनराजेंचा इशारा

दरम्यान, कोरोना बळी शहरातच नाही, तर राज्यभरात वाढले असल्याचे पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी यासंदर्भात 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. तसेच गेल्या काही दिवसांपासून वाढलेले मृत्यू हे कोरोनाचे नसून ते इतर आजाराचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इतर आजार असलेल्यांना कोरोना झाल्याने या बळींना कोरोनाचे लेबल लागते, असे ते म्हणाले. कोरोनाची तिसरी लाटही आता संपणार आहे. त्याअगोदर दोन आठवडे मृत्यू होतात, वाढतात, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com