राजेशाही असती तर त्यांना हत्तीच्या पायाखाली चिरडले असते : उदयनराजेंचा इशारा

कामगारांच्या Kamgar वेदना समजून घेतल्या पाहिजे, त्यासाठी हृदय Heart लागते तेच या लोकांकडे नाही. ४२ कोटींची जागा आठ कोटींना दिली आहे, असा आरोप खासदार MP उदयनराजे Udayanraje Bhosale यांनी केला.
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosaledesign@apglobale.com
Published on
Updated on

सातारा : पंडीत ऑटोमोटिव्हच्या कंपनीच्या कामगारांच्या आंदोलनात आज खासदार उदयनराजे भोसले यांनी उडी घेत आता कामगारांनी आत्मदहन करण्याऐवजी हे सर्व घडवून आणून अन्याय करणाऱ्यांचे दहन करावे, असा सल्ला दिला. राजेशाही असती तर त्यांना हत्तीच्या पायाखाली चिरडले असते, असा सूचक इशारा त्यांनी दिला.

साताऱ्यातील पंडित ऑटोमोटिव्ह प्रा. लि. कंपनीच्या कामगारांनी सामुदायिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कंपनीची जागा खरेदी केल्याने कामगार आक्रमक झाले आहे. कामगारांना पगार मिळालेला नसून त्यांना कंपनीतच येऊन दिले जात नाही. कामगारांच्या या व्यथा ऐकून आज खासदार उदयनराजे भोसले यांनी या आंदोलनात उडी घेतली. तसेच आपली भूमिका मांडली.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
पंडित ऑटोमोटिव्हचा तो लिलाव बेकायदेशीर; कामगार संघटनेची न्यायालयात हरकत

उदयनराजे म्हणाले, १९७४ सालात त्यावेळचे लोकप्रतिनिधी होते, ते काय करत होते. त्यांनी औद्योगिक वसाहतीतील कामगारांना संरक्षण दिले नाही. सातारा औद्योगिक वसाहतीचे नाव खराब झाले आहे. येणारे मोठे प्रोजेक्ट होते, ते निघुन गेले. कोयनेसह अकरा धरणे जिल्ह्यात असून एमआयडीसी माळावर का गेली. याला कारणीभूत कोण कोणाचा स्वार्थ होता. असा विचार कोणी केला तर ते लोक व कामगारांना गुन्हेगार ठरविले जातात. बँकेने लोन दिले म्हणजे वसुल झाले पाहिजे. पण जागा ४२ कोटींची असून बँकेसह सर्वांचे संगनमत झाले आहे.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
शिवेंद्रसिंहराजे म्हणतात, सातारा पालिकेची निवडणूक आम्ही स्वबळावर लढणार

लोकप्रतिनिधी म्हणून आपण काहीही करू शकता, टाळूवरचे लोणी खायचे काम केले आहे. कामगारांच्या वेदना समजून घेतल्या पाहिजे, त्यासाठी हृदय लागते तेच या लोकांकडे नाही. ४२ कोटींची जागा आठ कोटींना दिली आहे. आम्ही काही माणसं देतो, ते १६ कोटी देतील. त्यांना जागा द्या कशाला नुकसान करून घेता. एमआयडीसी नावारूपाला यायला हवी होती. पण त्या काळात आणि आजही त्यांना राजाश्रय कोणाचा होता.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Video:चंद्रकांत दादा पाटलांनी मारली खासदार उदयनराजे भोसले यांची स्टाइल...चुटकी वाजवत दिला विरोधकांना समज

त्यावेळी मी ठामपणे आवाज उठवला तर माझ्यावर खंडणीच्या केसेस टाकल्या. भूमिपूत्रांना पहिले काम दिले पाहिजे, अशी भूमिका मी मांडली तर माझ्यावर दोन लाखांची खंडणीची केस त्या मालकाला टाकायला लावली. मग या कामगारांचे काय होणार. पण, मी त्यांच्या चिंध्या होऊ देणार नाही. दोन लाखांची खंडणी घ्यायला मी काय चिंधी चोर आहे का, लोकांची प्रगती झाली पाहिजे. एमआयडीसीला लागलेली ही किड असून यांच्या खोलात मी जाणार आहे.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Video: खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली अजित पवार यांची भेट

मी संसदेच्या अधिवेशनासाठी जात आहे, परत येईपर्यंत एमआयडीचा तपशील अधिकाऱ्यांनी द्यावा. तसेच न्यायालयीन प्रक्रिया करून या प्रकरणाची चौकशी लावावी. पोलिसांनी बाहेरच्या कामगारांची माहिती घ्यावी. पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेऊ, या कामगारांचा निर्णय झाला पाहिजे. यावेळी उपस्थित महिला कामगारांनी आमच्यावर आत्मदहनाची वेळ आली आहे, अशी भूमिका मांडली. त्यावर उदयनराजेंनी त्यांना तुम्ही आत्मदहन करू नका, हे सर्व घडवून आणणाऱ्यांचे दहन करा, असा सल्ला दिला. ''आम्ही कोणाकडे न्याय मागायचा,'' असा प्रश्न महिला कामगारांनी केला. त्यावर उदयनराजेंनी राजेशाही मागा राजेशाही असती तर अन्याय करणाऱ्यांना हत्तीच्या पायाखाली चिरडले असते, असा सूचक इशारा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com