Pune Rape Case : पुण्यातील कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रु सोसायटीत कुरिअर बाॅयने घरात घुसून तरुणीवर बलात्कार केल्याचे समोर आले होते. तरुणीने पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. मात्र, पोलिस तपासात कुरिअर बाॅयने नव्हे तर तिच्याच ओळखीच्या तरुणीने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा तसेच तो तरुण तिचाच बाॅयफ्रेंड असल्याचे उघड झाले. पोलिसांनी फक्त तरुणीला एक फोटो दाखवला आणि तिचे भिंग फुटले.
आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. मात्र, सोसायटीमधील लोकांनी त्यांना पाहिले नव्हते. मात्र, तो तरुणीच्या घरी आल्याचे निश्चित होते. पोलिसांनी पीडित तरुणीला आरोपीचा फोटो दाखवला आणि याला ओळखता म्हणून विचारले. त्यानंतर तरुणी एक ते दोन मिनिटे तरुणी शांत बसली आणि ओळखत नाही असे उत्तर दिले. त्यानंतर अचानकपणे तिने हा फोटो तुमच्याकडे कसा आला? असा प्रश्न केला.
तरुणीच्या प्रश्नाने पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आणि आरोपी तरुणीची ओळखीचा असल्याचा संशय त्यांना बळवला आणि त्या अनुषंगाने त्यांनी तपास केला. त्यावेळी पीडितेची हा कट रचल्याचे समोर आले. अत्याचार करणारा तिचाच फाॅयफ्रेंड होता.
कुटुंबीयही एकमेकांच्या ओळखीचे तरुणी आणि तिचा बाॅयफ्रेंड याची ओळख एका ते दीड वर्षापू्र्वी समाजाच्या एका कार्यक्रमात झाली होती. तरुणी एका आयटी कंपनीत कामाला आहे. तरुणी आणि तिच्या बाॅयफ्रेंडचे परिवार एकमेकांना ओळखतात. तिचा बाॅयफ्रेंड हा तिच्या घरी ये जा सुद्धा करत होता. मात्र त्यांच्या नात्याविषयी त्यांच्या कुटुंबीयांना माहिती नाही.
तरुणीच्या घरचे बाहेरगावी होते त्यामुळे तिचा बाॅयफ्रेंड तिच्या घरी आला होता. घरच्यांना कळू नये म्हणून त्याने सोसायटीच्या रजिस्टरमध्ये कुरिअर बाॅय म्हणून नोंद केली. मात्र, त्याने तरुणीसोबत संबंध ठेवायची इच्छा व्यक्त केली. मात्र, तरुणीने मासिक पाळीचे कारण देत स्पष्ट नकार दिला. मात्र, त्याने संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केली. त्यातून, दोघांमध्ये वाद झाला अन् तरुणीने थेट पोलिस स्टेशन गाठत कुरिअर बाॅयकडून अत्याचार झाल्याची तक्रार दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.