BJP News: भाजप आमदाराच्या घरात घुसण्याचा प्रयत्न; शिवीगाळ करत धमकावलं, एकाला अटक

Pune BJP MLA Police Complaint: अटक करण्यात आलेल्या व्यक्ती हा आमदार यांच्या निवासस्थानी जाऊन सातत्याने शिवीगाळ करत होता. त्यांनी आमदार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करून तीनदा शिवीगाळ करून मारहाणीची धमकी देत गोंधळ घातल्याचा प्रकार घडला होता.
BJP Flag
BJP FlagSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील भाजप आमदारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना वारंवार शिवीगाळ करणाऱ्या आणि धमकावणाऱ्या एका व्यक्तीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सहकारनगर पोलीस स्थानकात विविध कलमा अन्वये याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

अटक करण्यात आलेल्या व्यक्ती हा आमदार यांच्या निवासस्थानी जाऊन सातत्याने शिवीगाळ करत होता. त्यांनी आमदार भीमराव तापकीर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करून तीनदा शिवीगाळ करून मारहाणीची धमकी देत गोंधळ घातल्याचा प्रकार घडला होता.

याबाबत भाजप आमदारांनी सहकार नगर पोलिस चौकीमध्ये तक्रार देखील दिली होती. त्यानंतर त्या व्यक्तीवर जुजबी कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतर देखील हा व्यक्ती सातत्याने आमदार यांच्या घराजवळ येऊन घरात घुसण्याचा प्रयत्न करत शिवीगाळ करत होता.

या व्यक्तीच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदारांनी केली असता देखील त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात न झाल्याने आमदारांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहीत याबाबत लक्ष घालण्याची मागणी केली होती.

BJP Flag
Elon Musk Donald Trump: इलॉन मस्क यांची मोठी घोषणा; डोनाल्ड ट्रम्प यांची साथ सोडली

त्यानंतर पोलिस आयुक्तांच्या सूचनेनुसार आता सहकार नगर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला अटक केली आहे. याबाबत सहकार नगर पोलिस ठाणे येथे दिनांक 27/05/25 रोजी अजित गणपत देवघरे यांनी तक्रार दिली आहे. अजित देवघर हे सध्या आमदारांच्या सुरक्षतेसाठी तैनात आहेत.

लोकसेवक यांना कर्तव्य पार पाडण्यापासून धाक दाखवून परावृत्त करणे व फौजदारी पात्र बल प्रयोग करणे तसेच दुखापत व हमला करण्याची पूर्वतयारी करणे, या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शंकर सर्जेराव धुमाळ यांना पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे.

मुंबई दारूबंदी अधिनियम कलम 85(1) भारतीय दंड संहिता कलम 352 (उपद्रव करणे), 351(2)(3) (आक्रमणाची धमकी), 132 (सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला), 333 (कर्तव्य बजावत असलेल्या लोकसेवकाला दुखापत करणे), पोलीस (अप्रीतीची भावना चेतवणे) अधिनियम, 1922 अंतर्गत कलम 3 या कायद्यांनुसार शंकर धुमाळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com