NCP News : जेजुरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाचा खून

Crime News : पानसरे हे सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते.
Mehboob Pansare
Mehboob Pansare Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा खून झाल्याची माहिती समोर येत आहे. शुक्रवारी सांयकाळी जेजुरी येथे ही घटना घडली. महेबुब पानसरे असे या नेत्याचे नाव आहे. पानसरे हे जेजुरी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक होते.

शेतजमिनीच्या जुन्या वादाच्या कारणावरून पानसरे यांचा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. पानसरे हे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. पानसरे यांच्या हत्येमुळे जेजुरी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Mehboob Pansare
Rohit Pawar : राष्ट्रवादी फुटीचं पूर्ण खापर अजितदादांवर फोडता येणार नाही..; रोहित पवार म्हणाले, '.. तेच बडवे आहेत का..?

शुक्रवारी सांयकाळी महेबुब पानसरे यांच्यावर चार ते पाच जणांनी कोयता आणि कुऱ्हाडीने वार केले. या घटनेत पानसरे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. किरण वनेश परदेशी, वनेश प्रल्हाद परदेशी, स्वामी वनेश परदेशी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

Mehboob Pansare
Neelam Gorhe Joins Shinde Group: शिंदे गटातील प्रवेशानंतर तासाभरातच नीलम गोऱ्हेंना मोठं गिफ्ट, प्रवीण दरेकरांनी मांडला प्रस्ताव..

नाझरे धरण (Pune News) परिसरात मेहबूब पानसरे यांची शेती आहे. या शेतात ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत सुरु होती. मेहबूब पानसरे आणि त्यांच्याबरोबर इतर तिघेजण हे शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शेतातील मशागतीचे काम पाहण्यासाठी गेले होते.

यावेळी वनेश परदेशी यांचे मेहबूब पानसरे यांच्यात शेतजमिनीच्या जुन्या वादाच्या कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेला,यावेळी वनेश परदेशी त्यांची दोन मुले, इतर पाच जणांनी मेहबूब पानसरे आणि इतर दोघांवर कुऱ्हाड आणि कोयत्याने (Crime News) वार केले, यात तिघे जण जखमी झाले.या हल्ल्यात पानसरे गंभीर झाले होते, अतिरक्तस्त्रावाने त्यांचा मृत्यू झाला.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com