Ajit Pawar Pune Daura: अजितदादा पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर; दहा सामाजिक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, काय आहे कारण ?

Ajit Pawar In Pimpri-Chinchwad : उपमुख्यमंत्री फडणवीस, अमित शाहांच्या दौऱ्यादरम्यान देखील सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
Pimpri-Chinchwad Police
Pimpri-Chinchwad Police Sarkarnama

पिंपरी : उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पावणेदोन महिन्यांनी अजित पवार हे शुक्रवारी पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर आले. यावेळी फुलांची मुक्त उधळण करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या(अजित पवार गट) वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यात माजी नगरसेवक व भावी नगरसेवक (आगामी महापालिका निवडणुकीतील इच्छूक) आघाडीवर होते.

उपमुख्यमंत्र्यांचा शहर दौरा आणि उद्योगनगरीतील काही सामाजिक कार्यकर्त्यांची स्थानबद्धता हे एक समीकरणच आता झाले आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यापूर्वी उद्योगनगरीतील राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा सकाळी सुरु होण्यापूर्वीच सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष सतीश काळे, भाऊसाहेब अडागळे, प्रकाश जाधव आणि भक्तीशक्ती शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी अशा दहाजणांना पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन स्थानबद्ध केले. नंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेले.

Pimpri-Chinchwad Police
Maan NCP News : शरद पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला; म्हणाले, मी कांदा उत्पादकांवर कधीच कर बसवला नाही...

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला (ता.१४) डॉ.डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाच्या १४ व्या पदवीप्रदान सोहळ्यासाठी राज्यपाल रमेश बैस हे पिंपरीत आले होते. त्यावेळी त्यांच्या या दौऱ्याला कसलाच विरोध नसलेल्या भापकरांसारख्या काही सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांना पिंपरी पोलिसांनी सकाळीच ताब्यात घेतल्याने त्यांनी मोठा संताप व्यक्त केला होता. तर, त्याअगोदर आठ दिवसांपूर्वीच (ता.६) केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या शहर दौऱ्यातही पोलिसांनी भापकरांसह अनेक कार्यकर्त्यांना काही तास स्थानबद्ध केले होते.

Pimpri-Chinchwad Police
Sanjay Raut On NCP: राष्ट्रवादीचा अर्धा गट भाजपसोबत, मग याला फूट नाही तर काय म्हणायचे ? खासदार राऊतांचा सवाल

शिवजयंती, अण्णाभाऊ साठे जयंती तसेच निगडीच्या जत्रेसाठी भक्तीशक्ती चौकातील भुखंड राखीव ठेवण्याची मागणी शिवउत्सव समितीने 'पीएमआरडीए'कडे केली होती. पण, ती मान्य न करता सदर भूखंड एका बिल्डरला देण्यात आल्याने समिती अजित पवारांच्या आजच्या दौऱ्यात त्यांच्या चिंचवड येथील मेळाव्यात निदर्शने करण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी त्यापूर्वीच समिती पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. 'पीएमआरडीए'ने समितीला देऊ केलेली पर्यायी एक एकरची जागा गैरसोयीची असल्याने ती घेण्यास समिती राजी नाही.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com