Attack On Women Sarpanch: दलित वस्तीत घुसून महिला सरपंचासह पतीस मारहाण ; माफी मागा, नाहीतर तलवारीने तुमचे तुकडे..

Attack On Sarpanch: दोघांना अटक
Pune Crime News
Pune Crime News Sarkarnama
Published on
Updated on

Pune Crime News: तलवारीचा धाक दाखवित चिंचोली मोराची (ता. शिरूर) येथील दलित वस्तीवर महिला सरपंच व त्यांच्या पतीसह कुटूंबियांना मारहाण केल्याची धक्कादायक बाब नुकतीच घडली.

त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण आहे. येथे तणावपूर्ण शांतता आहे. चिंचोलीच्या उपसरपंच व प्रभारी सरपंच अश्विनी विजय मोहिते यांनी याबाबत फिर्यादी दिली आहे.

शिरूर पोलिसांनी महेश कैलास नाणेकर, निखिल धैर्यशील नाणेकर, धैर्यशील शिवाजी नाणेकर, सुनिता राहुल नाणेकर, सविता धैर्यशील नाणेकर यांच्यासह तिघांविरूद्ध, बेकायदा जमाव जमवून दलित वस्तीवर हल्ला व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दोघांना अटक केली आहे, अशी माहिती शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांनी 'सरकारनामा'ला दिली.

Pune Crime News
Mega Bharti 2023 for 75000 posts : मुख्यमंत्र्यांनी शब्द खरा करुन दाखवावा ; घोषणा झाली, कृती कधी ? विद्यार्थ्यांचा सवाल

गुरूवारी (ता. १) सायंकाळी घडलेल्या या प्रकारानंतर चिंचोलीच्या दलित वस्तीत भितीचे वातावरण असून, याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. घटनेनंतर उशीरा याबाबत फिर्याद देण्यात आली.

एक जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास सविता नाणेकर, सुनिता नाणेकर, महेश नाणेकर, निखिल नाणेकर, धैर्यशील नाणेकर यांच्यासह तिघांनी मोहिते वास्तव्यास असलेल्या दलितवस्तीत येऊन वैशाली मोहिते यांना मारहाण केली. स्टंप, तलवारीचा धाक दाखविला. सरपंच मोहिते, त्यांचे पती विजय मोहिते, कांताबाई मोहिते यांना मारहाण केली. राहुल नाणेकर यांची माफी मागायला गावात चला नाहीतर तलवारीने तुमचे तुकडे करू, अशी धमकीही हल्लेखोरांनी दिली. या प्रकाराला पाच दिवस उलटल्यानंतरही चिंचोलीच्या दलित वस्तीत भितीचे वातावरण आहे.

Pune Crime News
ACB Raid Pune : एसीबीची पुण्यात कारवाई ; तलाठ्याच्या नावाने लाच मागणाऱ्या दोघा मदतनीसांना अटक

नेमका काय घडलं..

चिंचोलीचे यापूर्वीचे उपसरपंच राहुल नाणेकर यांनी राजीनामा दिल्यानंतर दहा ऑक्टोबर २०२२ पासून अश्विनी मोहिते या उपसरपंचपदावर आल्या. एप्रिल २०२३ ला सरपंच अशोक गोरडे यांनी राजीनामा दिल्याने सरपंचपदाचा प्रभारी पदभारही त्यांच्याकडे होता. या दरम्यान, ३१ मे रोजी झालेल्या चिंचोली च्या ग्रामसभेत मोहिते यांच्या जाऊ वैशाली मोहिते यांना राहुल नाणेकर याने धक्का दिल्याने वाद झाला. तथापि, ग्रामसभेला उपस्थितांनी हा वाद मिटविला.

मात्र, ग्रामसभेनंतरही राहुल नाणेकर, दशरथ पडवळ व अण्णा साळे हे ग्रामपंचायतीबाहेर गोंधळ घालत होते. त्यावेळी त्यांनी वैशाली मोहिते यांच्यासोबत पुन्हा वाद घातला असता वैशाली मोहिते यांनी तिघांच्याही कानाखाली दिली. हा वाद वाढू नये म्हणून सरपंच मोहिते यांनी या वादात मध्यस्थी करून वैशाली मोहिते यांना तिघांचीही माफी मागायला लावून त्या घरी गेल्या.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com