Darshana Pawar Killing Case : दर्शना पवार हत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अटकेत असलेल्या अटकेत असलेल्या राहुल हंडोरेला सोमवारी (४ जुलै) न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.
दर्शना आणि राहुल यांची लहानपणापासून ओळख होती. दर्शना आणि राहुल दोघेही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होते. राहुल 'एमपीएससी'ची तयारी करताना अर्धवेळ नोकरीही करायचा. राहुलने दर्शनाच्या घरच्यांसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र त्यांनी नकार दिला होता. दरम्यान, दर्शनाची आरएफओ म्हणून निवड झाली. ती पुण्यात एका कार्यक्रमासाठी आली होती. पुण्यात आल्यानंतर राहुल आणि दर्शना राजगडावर ट्रेकिंगसाठी गेले होते. पण याठिकाणी दोघांमध्येही बाचाबची झाली, रागाच्या भरात राहुलने दर्शनाचा खून केला.
१८ जून रोजी दर्शनाचा मृतदेह सापडल्यानंतर हंडोरे यांनी तातडीने पुणे सोडले. त्यानंतर त्याने रेल्वेने प्रवास सुरू केला. दुसरीकडे, राहुल हंडोरेनेही (Rahul Handore पुणे सोडले होते. पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचाही खूप प्रयत्न केला.
त्याने रेल्वेने प्रवास सुरू केला. सांगली- गोवा- चंदीगड- पश्चिम बंगाल अशा अनेक ठिकाणी त्याने रेल्वेने प्रवास केला. अखेर मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकावर राहुल हंडोरे पोलिसांनी त्याला पडकले. तो अंधेरीहून पुण्याला जात होता. पोलीस अधिक्षक अंकीत गोयल म्हणाले, दर्शना पवार हिचा मृतदेह पंचनामा केल्यानंतर आम्हाला तिच्या शरिरावर काही खुणा आढळून आल्यामुळे याबाबत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. परिस्थितीजन्य पुरावे आढळल्यामुळे आरोप निश्चित केले.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.