Pune Crime News : धक्कादायक! एमपीएसीत सहावी आलेल्या युवतीचा संशयास्पद मृत्यू; राजगडाच्या पायथ्याशी आढळला मृतदेह

Rajgad Fort News : दर्शना ही एमपीएससी परीक्षेत राज्यात सहावी आली होती....
Crime News
Crime News Sarkarnama
Published on
Updated on

Velhe : वेल्हे तालुक्यातील किल्ले राजगडच्या पायथ्याशी एका तरुणीचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना रविवारी( दि.१८) समोर आली आहे. एमपीएससीच्या परीक्षेत सहावी आलेल्या तरुणीचा हा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

ही तरुणी मूळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव(Kopargaon) तालुक्यातील सहजानंदनगर येथील आहे. मयत तरुणीचे नाव दर्शना दत्ता पवार (वय २६) असे आहे. दर्शना पुण्यातून १२ जूनपासून बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दाखल होती. या घटनेबाबत वेल्हे पोलीस ठाण्यात तरुणीचे वडील दत्ता दिनकर पवार यांनी फिर्याद दिली आहे.

Crime News
Gunratna Sadavarte On Aurangjeb : औरंगजेबाची कबर काढून समुद्रात नेवून फेका..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शना ९ जून रोजी पुण्यातील एका खासगी अकॅडमीमध्ये सत्कार स्वीकारण्यासाठी आली होती. दुसऱ्या दिवशी कुटुंबीय दर्शनाला फोन करत होते. परंतू, तिने घरातील कोणाचेही फोन उचलले नव्हता. त्यामुळे तिच्या वडिलांनी १२ जून रोजी पुण्यात येऊन ॲकॅडमीत चौकशी केली.

त्यावेळी दर्शना ही राजगड किल्ला फिरण्यासाठी गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वडील आणि पोलिसांकडून मुलीचा शोध सुरु होता. दर्शना ही एमपीएससी परीक्षेत राज्यात सहावी आली होती. तिची ‘रेंज फॉरेस्ट ऑफिसर’ या पदावर नुकतीच निवड झाली होती.

वेल्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शना ९ जून रोजी पुण्यातील एका खासगी अकॅडमीमध्ये सत्कार स्वीकारण्यासाठी आली होती. दुसऱ्या दिवशी कुटुंबीय दर्शनाला फोन करीत होते. परंतु तिने घरातील कोणाचेही फोन उचलले नाहीत. त्यामुळे तिच्या वडिलांनी १२ जून रोजी पुण्यात येऊन ॲकॅडमीत चौकशी केली. त्यावेळी दर्शना ही राजगड किल्ला(Rajgad Fort) फिरण्यासाठी गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वडील आणि पोलिसांकडून मुलीचा शोध घेण्यात येत होता.

Crime News
Uddhav Thackeray on Modi : उध्दव ठाकरेंकडून मोदी- शाह यांची हिटलरशी तुलना ; म्हणाले, '' हिटलरसुद्धा असाच...''

दरम्यान, गुंजवणी ग्रामपंचायतचे सदस्य शिवाजी भोसले हे रविवारी सकाळी राजगडच्या पायथ्याशी सतीचा माळ परिसरात गेले होते. त्यांना तेथे दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. त्यांनी परिसरात पाहणी केली असता मृतदेह अर्धवट सडलेल्या स्थितीत आढळून आला. त्यांनी या घटनेची माहिती पोलिस पाटील बाळासाहेब रसाळ यांना दिली. त्यानंतर रसाळ यांनी सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्याशी संपर्क साधला.

पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस(Police) अधिक्षक मितेश गट्टे म्हणाले, दर्शनाच्या शरीरावरील जखमा मारहाणीमुळे झाल्या आहेत की प्राण्याच्या हल्ल्यामुळे याचा तपास करण्यात येत आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होइल. हा अकस्मात मृत्यू आहे की घातपात? याबाबत पुणे ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.

Crime News
Dilip Walse Patil News : आम्हाला चिंता होती; मात्र विलासराव म्हणाले, दिलीपराव तुमचे महाविद्यालय मंजूर: वळसे पाटलांनी सांगितला किस्सा

वेल्हे पोलीस आणि दर्शनाचे वडील दत्तात्रेय पवार घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी मृतदेहाजवळ मोबाईल, पर्स, शूज, ओढणी आढळून आली. उपसरपंच बाळासाहेब पवार, स्थानिक रहिवासी राहुल बांदल, पोलिस मित्र संतोष पाटोळे, विजय गोहिणे, विक्रांत गायकवाड यांनी मृतदेह गडाच्या पायथ्यास आणण्यास मदत केली. दर्शनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com