Siddharth Shirole Pune News : काम काँग्रेस नगरसेवकाचे, श्रेयासाठी भाजप आमदार पुढे?

Political News : हे संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी काँग्रेसने पाठपुरावा केलेला असतानाही केवळ कामाचे श्रेय घेण्यासाठी भाजपकडून हा अट्टाहास सुरू असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
Siddharth Shirole, datta a Bahirat
Siddharth Shirole, datta a Bahiratsarkarnama
Published on
Updated on

Pune : गोखलेनगर, जनवाडी या प्रभाग क्रमांक 11 ब मध्ये असलेल्या आशानगर भागात महापालिकेने 20 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारली आहे. या संपूर्ण टाकीचे काम पूर्ण करण्यामध्ये मी पुढाकार घेतला होता, असे या भागातील स्थानिक माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी म्हटले आहे. मात्र, या टाकीच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सुरू केला आहे. या टाकीचे उदघाटन करण्याचा ठराव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मान्य करण्यात आलेला असतानाही याकडे दुर्लक्ष करत आमदारांच्या दबावाखाली हे उदघाटन करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप काँग्रेस करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या टाकीचे उदघाटन करण्यात येणार आहे.

आशानगर भागातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी पालिकेने या भागात पाण्याची टाकी उभारली आहे. यासाठी या भागातील तत्कालीन नगरसेवक दत्ता बहिरट (Datta Bahirat) यांनी विशेष प्रयत्न केले. येथे महापालिकेची जागा उपलब्ध नसल्याने आशानगर सोसायटीच्या सभासदांनी यासाठी मोफत जागा देखील उपलब्ध करून दिली. तसेच यासाठी वेळोवेळी साडेचार कोटी रुपये देखील उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर हे काम पूर्ण करण्यात आले. Siddharth Shirole Pune News

Siddharth Shirole, datta a Bahirat
Mahavikas Aghadi Movement : महाविकास आघाडीच्या आंदोलनात तृतीयपंथी; आमदार नाईकांची केली हाय.. हाय...!

हे संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी काँग्रेसने (Congress) पाठपुरावा केलेला असतानाही केवळ कामाचे श्रेय घेण्यासाठी भाजपकडून हा अट्टाहास सुरू असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. माजी नगरसेवक दत्ता बहिरट, कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकार परिषद घेत हा आरोप केला. या भागाचा नगरसेवक असताना 2012 मध्येच ही पाण्याची टाकी बांधण्याचा ठराव स्थायी समितीमध्ये दिला होता. या भागातील रहिवाशांची पाण्याची अडचण आणि अनियमित पाणीपुरवठा नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी या गोष्टी लक्षात घेऊन हे काम हाती घेण्यात आले होते, असे बहिरट यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हे काम करताना अनेक अडचणी आल्या. या भागात पाण्याची टाकी बांधायचे असेल तर जागा उपलब्ध नाही. त्यामुळे तुम्ही जागा उपलब्ध करून द्या, असे पालिका प्रशासनाने सांगितले होते. त्यावर अशा नगर सोसायटीच्या मालकीची जागा ताब्यात घेऊन ही पाण्याची टाकी बांधण्याचे नियोजन केले. ही जागा या सोसायटीने महापालिकेला विना मोबदला दिलेली आहे. ही जागा ताब्यात घेताना आवश्यक असलेले सरकारी शुल्क पालिकेने भरलेले नाही. ती मी स्वतः भरून त्यानंतर ही जागा पालिकेला दिली असल्याचे यांनी स्पष्ट केले. गेल्या अनेक वर्ष पाठपुरावा केल्यानंतर आता ही टाकी पूर्णत्वास गेली असून या टाकीमुळे या भागातील पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे, असे दत्ता बहिरट यांनी स्पष्ट केले.

याचे श्रेय काँग्रेसला जाऊ नये यासाठी भाजपाचे आमदार शिरोळे यांनी परस्पर या टाकीचे उद्घाटन करण्यात का निर्णय प्रशासनाला घेण्यास भाग पाडला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या टाकीचे उद्घाटन होणार आहे. आपल्या कामाचे श्रेय भाजप कसे घेत आहे आणि आपल्याला कसे दूर ठेवले जात आहे, याबाबत पालकमंत्री अजित पवार यांना पत्र दिले असून तुम्हीच पालकमंत्री म्हणून याबाबत निर्णय घ्यावा, अशी विनंती करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आवश्यक ते प्रोटोकॉल पाळूनच उदघाटन

बहिरट नगरसेवक असताना त्यांनी या टाकीचे काम सुरू केले होते. वास्तविक पाहता दोन ते तीन वर्षात हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र त्यांच्याकडून ते झाले नाही. त्यानंतर या भागातील नागरिकांनी माझ्याकडे पाण्याबाबत तक्रारी केल्यानंतर यामध्ये आपण लक्ष घातले. त्यासाठी अतिरिक्त निधीदेखील उपलब्ध करून दिला. राज्यात आता आमची सत्ता असल्याने साहजिकच उदघाटन देखील आम्हीच करणार. आवश्यक तो प्रोटोकॉल पाहून त्यानंतरच हा उदघाटन कार्यक्रम घेतला असल्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.

...तर काँग्रेस करणार टाकीचे उदघाटन

काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाचे श्रेय लाटण्याचे काम भाजप आमदार करत असून हातात सत्ता असली की कशी वागले तरी चालते असा त्यांचा समज आहे. हा उदघाटनाचा कार्यक्रम पुढे न ढकलल्यास आणि बहिरट यांना डावलून अजितदादांच्या हस्ते उदघाटन करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही गप्प बसणार नाही. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता या पाण्याच्या टाकीचे उदघाटन काँग्रेस करेल, असे आमदार रवींद्र धंगेकर यांनी जाहीर केले.

(Edited By Roshan More)

Siddharth Shirole, datta a Bahirat
Lok Sabha Election 2024 : "महाराष्ट्रातील 48 जागा 'इंडिया आघाडी' जिंकणार.." ; महिला काँग्रेस अध्यक्षांचा दावा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com