गांजाळे भाजपत जाणार होते; पण त्यांना प्रवेश मिळाला नाही : शिवसेना नेत्याचा आपल्याच सहकाऱ्यावर हल्लाबोल

शिवसेनेतील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
Datta Ganjale-Rajaram Bankhele
Datta Ganjale-Rajaram BankheleSarkarnama
Published on
Updated on

मंचर (जि. पुणे) : हिंदूहृदयसम्राट (स्व.) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या बुधवारी (ता. १६ नोव्हेंबर) होणाऱ्या स्मृतीदिन कार्यक्रमाची आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना (Shivsena उद्धव बाळसाहेब ठाकरे) पक्षातर्फे तयारी सुरू होती. त्याचवेळी कार्यक्रमाचे आयोजक माजी आदर्श सरपंच दत्ता गांजाळे यांच्यावर शिवसेनेचे जिल्हा संघटक राजाराम बाणखेले यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार हल्लाबोल केला. यामुळे शिवसेनेतील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. (Datta Ganjale was going to join BJP; But they did not get admission : Rajaram Bankhele)

शिवसेना उपनेते, शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांचे बुधवारी संध्याकाळी व्याख्यान, गुरुवारी (ता. १७) सकाळी मोफत आरोग्य तपासणी व रामायणाचार्य समाधान महाराज भोजेकर यांचे संध्याकाळी कीर्तन आयोजित केले आहे. या वेळी शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, जिल्हाप्रमुख सुरेश भोर, माऊली कटके, दिलीप बाम्हणे, मंगल राऊत, गोविंद काळे, दिलीप पवळे आदी उपस्थित राहणार आहेत, असे कार्यक्रमाचे आयोजक व लोकमान्य प्रतिष्ठानचे संस्थापक दत्ता गांजाळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Datta Ganjale-Rajaram Bankhele
‘भीमा’च्या निवडणुकीबाबत परिचारकांनी फडणवीसांना ‘हा’ शब्द दिला होता : महाडिकांनी सांगितली इनसाईड स्टोरी

दुसरीकडे याच पक्षाचे जिल्हा संघटक बाणखेले यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, माजी सरपंच गांजाळे यांनी कोणालाही विश्वासात न घेता कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी भाजपचे आमदार महेशदादा लांडगे स्पोर्टस व लोकमान्य प्रतिष्ठानतर्फे अनुक्रमे ता. १९ ऑगस्ट रोजी दहीहंडी व ता. ६ सप्टेंबर रोजी घरगुती गणेश सजावट स्पर्धा भरविल्या होत्या. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनाही भेटून भाजप प्रवेशाची तयारी केली होती. पण, त्यांना प्रवेश मिळाला नाही. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते कधीच आमच्याबरोबर आले नाहीत किंवा शिंदे गटाचा त्यांनी निषेध केला नाही. त्यामुळे मी या कार्यक्रमाला हजर राहणार नाही.

Datta Ganjale-Rajaram Bankhele
गुवाहाटीत झालेल्या राजकीय स्फोटाची बत्ती आमदार राऊतांनी बार्शीतून पेटवली : कल्याणशेट्टींचा सत्तापालटाबाबत गौप्यस्फोट

त्यांना मी जास्त महत्व देणार नाही : गांजाळे

(स्व) बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन कार्यक्रम महत्वाचा आहे. बाळासाहेबांचा स्मृतीदिन आणि जयंती कार्यक्रमाचे मी गेली अनेक वर्ष आयोजन करत आहे. मी कोणत्याही पक्षात गेलो नाही व जाणार नाही. शिवसेनेतच आहे. कोणी माझ्यावर काय टीका केली. या विषयाला मी महत्व देत नाही, असे मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com