Yavat News : मुलाच्या अपघाती मृत्यूस आपला चुलत भाऊ आणि त्याचा मुलगाच जबाबदार आहे, अशी मनाशी खूणगाठ बांधून मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पाच सख्खा भांवडांनी सात जणांची हत्या केल्याचे पोलीस तपास उघड झाले आहे. दौंड (Daund) तालुक्यातील भीमा नदी पात्रात मृतदेह आढळलेल्या सात जणांनी आत्महत्या केली नाही, तर त्यांच्याच नातेवाईकांनी थंड डोक्याने हे हत्याकांड घडविल्याचे पुढे आले आहे. याबाबत आता मोठी अपडेट येत आहे.
भीमा नदी पात्र हत्या संदर्भात एक मोठी माहिती समोर येत आहे. अत्यंविधी केलेल्या तीन मृतदेहांचं पुन्हा शव विच्छेदन करण्यात येणार आहे. पुरलेले तीन मृतदेह ससून रूग्णालयाच्या टीमने पुन्हा बाहेर काढले आहे. सात मृतदेहांपैकी तीन मृतदेहांचं आता पुन्हा एकदा शवविच्छेदन होणार आहे.
मोहन पवार यांचे कुंटुंबियांच्या सात जणांची हत्या करून ते पाण्यात फेकून देण्यात आले. याआधीही ससूनमध्ये शवविच्छेदन झाले होते. आज तीन मृतदेह ससून टीमच्या उपस्थितीत बाहेर काढण्यात आले. तपासामध्ये नवीन गोष्टी समोर येत आहेत. पोलिसांनी डॉक्टरांना विनंती केली की, काळजीपूर्वक पोस्ट मार्टम करा. काही गोष्टी आमच्या निदर्शनास आलेले आहेत. हा सगळा तपासाचा भाग आहे, असे पोलिसांनी सांगितले.
आज दुपारच्या दरम्यान तीन मृतदेह खड्ड्यातून काढलेल्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात येईल व काही वेळातच याचे अहवाल देखील येणार आहेत. त्या दिशेने पुढे तपास होईल.यात आणखी कोणी आरोपी आहे का ? य़ाचा ही शोध पोलिसांना घ्यायचा आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.