Ajit Pawar News : अजितदादा पुण्याचे पालकमंत्री झाल्यावर बावनकुळे म्हणाले, "जे ठरलं होतं तेच झालं..."

Maharashtra Politics : पुण्याचे पालकमंत्री बदलण्याचे पहिलेच ठरलं होते, त्याप्रमाणेच झाले,"
Chandrashekhar Bawankule and Ajit Pawar
Chandrashekhar Bawankule and Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune : अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये येऊन तीन महिने झाल्यानंतर पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला आहे. अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री झाले आहेत. गेले काही दिवस पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून चर्चा सुरू होती. चंद्रकांत पाटील यांच्याकडील पद काढून घेत ते अजितदादांकडे देण्यात आले आहे. चंद्रकांतदादांवर सोलापूर आणि अमरावतीच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर भाष्य केले आहे.

Chandrashekhar Bawankule and Ajit Pawar
Municipal Elections News : लोकसभेनंतरच होणार महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका; २८ नोव्हेंबरला पुढील सुनावणी ...

बावनकुळे म्हणाले, "पालकमंत्री बदलणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अधिकार आहे. जे ठरलं होतं तेच झालं. अजितदादा कधीही नाराज नव्हते, ते स्पष्टवक्ते आहेत. पुण्याचे पालकमंत्री बदलण्याचे पहिलेच ठरलं होते, त्याप्रमाणेच झाले."

पुण्याच्या पालकमंत्र्यांबाबत अजितदादा आग्रही होते. राज्यातील बारा जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे.

यापूर्वी पुण्याचे पालकमंत्रिपद जरी चंद्रकांत पाटील यांच्याकडे होते, तेव्हा अजित पवार हेच पालकमंत्री असल्यसारखे निर्णय घेत असल्याची चर्चा होती. अजितदादांना पुण्याचे पालकमंत्रिपद मिळेल, असे काही दिवसांपासून बोलले जात होते. आज या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले. अजित पवार नाराज नव्हते, असे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकारांना सांगितले.

पालकमंत्रिपदाची जबाबदारी...

पुणे- अजित पवार

अकोला- राधाकृष्ण विखे-पाटील

सोलापूर- चंद्रकांत पाटील

अमरावती- चंद्रकांत पाटील

भंडारा- विजयकुमार गावित

बुलडाणा- दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर- हसन मुश्रीफ

गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम

बीड- धनंजय मुंडे

परभणी- संजय बनसोडे

नंदूरबार- अनिल भा. पाटील

वर्धा - सुधीर मुनगंटीवार

Chandrashekhar Bawankule and Ajit Pawar
Gulabrao Patil News : गुलाबराव पाटलांचा सरकारला घरचा आहेर; शिंगांडे मोर्चा काढणार, जळगावात पीक विम्याचा प्रश्न पेटला...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com