Jalgaon Political News : राज्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाईंला दिंरगाई होत असल्याचा आरोप विरोधक करीत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय, राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईंचा पीक विमा देण्यात दिरंगाई होत असल्याबद्दल प्रश्न आता पेटला आहे. गुलाबराव पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले.
जळगाव जिल्ह्यात केळी पिकाचे अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले. मात्र अद्यापही तब्बल ८१ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. याबाबत राज्याचे ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सरकारला घराचा आहेर देत विमा कंपन्यांवर शिंगांडे मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने थेट जिल्हाधिकरी कार्यालयावर मोर्चा काढला. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने द्यावी, अशी मागणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड. रविंद्र पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, मजूर फेडरेशनचे माजी सभपाती लिलाधर तायडे आदी उपस्थित होते.
जळगाल जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे रावेर, यावल, सावदा, चोपडा या परिसरात केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी या नुकसानीची माहिती सादर करूनही त्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही."नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचा अंत पाहू नका," असा गर्भित इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.