Ajit Pawar : अजितदादांनी विरोधकांना केला 'जय महाराष्ट्र'; त्यांनी राजकारण करीत राहावे...!

DCM Ajit Pawar say Jai Maharashtra to opposition party:विरोधकांकडून विकासकामे आणि लोकप्रिय योजना कशा फसव्या आहेत. यावर सातत्याने होणाऱ्या टिकेला अजित पवार देखील आक्रमकपणे प्रत्त्युत्तर देत आहेत.
 ajit pawar
ajit pawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असो कि, शेतकऱ्यांना मोफत वीज असो या योजनांवरून विरोधकांकडून होत असलेल्या टिकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे. त्यांनी राजकारण करत राहावे.आम्ही फक्त विकास करू. जय महाराष्ट्र! अशी पोस्ट त्यांनी एक्स वर केली आहे.

विरोधकांकडून विकासकामे आणि लोकप्रिय योजना कशा फसव्या आहेत. यावर सातत्याने होणाऱ्या टिकेला अजित पवार देखील आक्रमकपणे प्रत्त्युत्तर देत आहेत. अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे. तोच माझा स्वाभिमान आहे, असेही पवार यांनी आक्रमकपणे सांगितले आहे.

'माझी लाडकी बहीण योजना' टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत. परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे. तोच माझा स्वाभिमान आहे. ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे, तसं त्यांनी स्पष्ट देखील केलं आहे. कारण, ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असं त्यांचे भाकित आहे. परंतु येत्या काळात या योजनेला अधिक बळकटी देवून या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करेन, असेही दादांनी आपल्या आक्रमक स्वभावातून दाखविले आहे.

 ajit pawar
Sheikh Hasina: अमेरिका, ब्रिटनने नकार दिल्यावर 'लढाऊ बेगम’ शेख हसीना आता कुठे जाणार?

लाडकी बहीण योजनेवर विरोधकांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.'माझी लाडकी बहीण योजना' टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगतो, पण अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे,'असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. विरोधकांच्या टीकेला अजितदादांना आपल्या शैलीत जोरदार खडेबोल मंगळवारी सुनावले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com