Ajit Pawar: अरे बाबा झाली चूक, मला काय माहीत हा दिवटा असा उजेड पाडेल; अजितदादांनी अशोक पवारांची उडवली खिल्ली

Shirur Lok Sabha Constituency 2024: मी आमदारांना म्हटलं तो नवखा आहे. पण आमदार काय ऐकायला तयार नाही. पुढं काय झालं, कारखाना बंद पडायची अवस्था निर्माण झाली.
Ajit Pawar, Ashok Pawar
Ajit Pawar, Ashok PawarSarkarnama
Published on
Updated on

Shirur Political News : लोकसभा निवडणुकीच्या आधीच आमदार अशोक पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडली आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) आज अशोक पवारांचा समाचार घेतला.

घोडगंगा कारखाना चालवायला जमत नसेल तर नवीन संचालक मंडळ आणू किंवा प्रशासकाची नेमणूक करू, शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये म्हणून लवकरच घोडगंगा कारखाना संकटातून बाहेर काढणार, असे म्हणत अशोक पवार वेडवाकडं चालत असल्याची टीका अजितदादांनी केली.

"तुमच्या आमदाराने खासगी कारखाना व्यवस्थित चालवला, पण तुमच्या हक्काच्या कारखान्याची माती केली. तुम्ही म्हणाल, आता काय बोलताय, आधी मतं तुम्हीच द्यायला लावली. अरे हो की बाबा झाली चूक, मला काय माहीत हा दिवटा असा उजेड पाडेल," अशा शब्दांत शेतकऱ्यांशी संवाद साधताना अजितदादांनी अशोक पवारांची खिल्ली उठवली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"शिरूर विधानसभेचे आमदार अशोक पवारांनी घोडगंगा कारखान्यावर मुलाला चेअरमन केलं. मी आमदारांना म्हटलं तो नवखा आहे. पण आमदार काय ऐकायला तयार नाही. पुढं काय झालं, कारखाना बंद पडायची अवस्था निर्माण झाली," याची आठवण अजितदादांनी अशोक पवारांना करून दिली. शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे शेतकरी मेळाव्यात अजित पवार बोलत होते.

Ajit Pawar, Ashok Pawar
Bal Mane News: लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात विधानसभा देऊ; भाजप माजी आमदारांच्या विधानाने खळबळ

आपल्या भागात पिकवलेला ऊस आपल्याच कारखान्यात जावा, अशी अपेक्षा असते. आता तुमचा ऊस लगतच्या भागातील कारखान्यात जातोय. त्यांचा काटा चांगला आहे. मात्र, ऊस देताना काटा नक्की चेक करा, बरेच कारखानदार काटा मारतात. आपण कष्टाने, घाम गाळून पिकवलेला ऊस आहे. त्यात आपली फसवणूक होणार नाही, यासाठी काटा तपासत चला, असा सल्ला अजित पवारांनी शेतकऱ्यांना दिला.

"मी शेतकरी आहे. त्यामुळे पोल्ट्री, फळबाग, भाजीपाला अशा प्रकारची शेती मी करतो. वेळ मिळेल तेव्हा मी शेतात जातो. मात्र, कामाच्या व्यापाने मला तिथं जाता येत नाही. पण त्या अनुभवातून मला शेतकऱ्यांच्या समस्या समजलेल्या आहेत, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहे," असे अजित पवार म्हणाले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com