Vasant More
Vasant MoreSarkarnama

Vasant More News: मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी, पुण्यात एकच खळबळ

Crime News: ३० लाखांची मागितली खंडणी...

Death Threat to MNS leader Vasant More's Son: पुण्यातील मनसेचे फायर ब्रँड नेते वसंत मोरे यांच्या मुलाला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. रुपेश मोरे याला ही दिली आहे. या धमकीमुळे एकच खळबळ उडाली आहे. यावेळी धमकी देणाऱ्यांनी ३० लाखांची खंडणी मागितली आहे. आता याप्रकरणी वसंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांच्या मुलाला एका अज्ञाताने मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. यावेळी मोरे यांचा मुलगा रुपेश यांच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीवर चिठ्ठी ठेवत त्याला मारण्याची धमकी दिली होती.

Vasant More
Shivsena : शिवगर्जनेत उपराजधानीकडे ठाकरेंचे दुर्लक्ष, पण ‘शिवधनुष्य’साठी शिंदे येणार !

आता पुन्हा एकदा वसंत मोरेेंचे चिरंजीव रुपेश मोरे (वय - २१) ला धमकी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यावेळी ३० लाखाची खंडणी मागणारा मेसेज पाठवला आहे. ३० लाख दे नाहीतर मुस्लीम मुलीसोबतच्या लग्नाचे बनावट प्रमाणपत्र व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. तसेच भारती पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुपेश वसंत मोरे यांच्या व्हाट्सअप मोबाईलवर अन्फिया शेख या मुलीसोबत विवाह झाले आहे असे ग्रामसेवक ग्रामपंचायत वडगाव तालुका सोयगाव जिल्हा औरंगाबाद येथील बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र पाठवले आहेत. तसेच ‘हमने आपके नाम का मॅरेज सर्टिफिकेट बनाया है, खराडी आयटी पार्क के सामने गाडी मे बीस लाख रुपये रख देना, नही तो आपके उपर रेप के केस कर देंगे असा धमकीचा मेसेज केला.

Vasant More
MNS News : उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधानपदाची चर्चा; मनसे नेत्याचं खोचक टि्वट; म्हणाले,'' भावी पंतप्रधानांना...!''

त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा एक मेसेज आला असून ‘मै अल्फिया शेख, 30 लाख रुपये नही दिये तो रेप के केस मे अंदर कर दुंगी अशा पद्धतीचा मेसेज पाठवण्यात आला आहे.

यानंतर पुन्हा काही दिवसानंतर ‘दे रहा है क्या पैसा नही तो मार दूंगा. तेरी पुरी सेटिंग हुई है, बहुत जल्द तेरे को गोली मार के जायेंगे, तेरे बाप को बोल देंगे तेरे को बचाने के लिए’ असा धमकीचा मेसेज करून तीस लाख रुपयांची मागणी मेसेजद्वारे केला आहे.

Vasant More
Ahmednagar News : माजी मंत्री शंकरराव गडाखांच्या दूध संघाचा वीज पुरवठा तोडला

‘सावध रहा रुपेश, अन्यथा...''

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. रुपेश हे वसंत मोरे यांच्यासोबत या रोजगार मेळाव्याला हजर होते. त्यांनी त्यांची कार थोरवे शाळेच्या वाहनतळात उभी केली होती. यावेळी एकाने त्यांच्या गाडीवर एक चिठ्ठी लिहून ठेवली. रुपेश हे परत गाडीवर आल्यावर त्यांना त्यांच्या गाडीवर एक कागद दिसला. त्यांनी तो वाचला असता त्यात, ‘सावध रहा रुपेश, अन्यथा असा धमकीवजा मजकुर लिहिलेला आढळला होता.

हा प्रकार गंभीर असल्याने वसंत मोरे आणि रुपेश मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलिसांत धाव घेत या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com