Radhakrishna Vikhe Patil-Rohan Suravse
Radhakrishna Vikhe Patil-Rohan SuravseSarkarnama

Pune News : युवक काँग्रेसची मागणी विखे मान्य करणार; आपल्याच खात्यातील विभागाची चौकशी लावणार?

Youth Congress News : सहायक दुय्यम निबंधक खात्याकडून मोठ्या प्रमाणावर वसुली सुरू असल्याचा एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता.
Published on

Pune News : जमिनीच्या विविध व्यवहारांची नोंदणी करताना दस्तनोंदणी कार्यालयात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचे आरोप केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी सहायक दुय्यम निबंधक खात्याकडून मोठ्या प्रमाणावर वसुली सुरू असल्याचा एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता. याचा संदर्भ घेत या व्हिडीओची सत्यता पडताळावी, यासाठी प्रदेश युवक काँग्रेसने राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेतली. (Deed registration department will be investigated?)

राज्यातील सहायक दुय्यम निबंधक खात्याकडून मोठ्या प्रमाणावर वसुली सुरू आहे, अशा आशयाचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला होता. पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक अशा विविध ठिकाणांहून दरमहा कोट्यवधी रुपयांची अवैध मार्गाने वसुली सुरू आहे. सर्व गोष्टींना या खात्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याचा आरोप अनेकदा केला जातो. या पार्श्वभूमीवर प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेतली. यामध्ये या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून यातील दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Radhakrishna Vikhe Patil-Rohan Suravse
Vitthal Sugar Factory : ‘काहीही करा; पण विठ्ठल बंद पाडा : राज्य बॅंक अन्‌ पोलिसांना मोठ्या नेत्यांचे फोन’

याबाबत अधिक माहिती देताना सुरवसे-पाटील म्हणाले, "दस्तनोंदणी विभागातील गैरकारभाराबाबत अनेकदा तक्रारी करूनही त्याकडे डोळेझाक केली जात आहे. संबंधित खात्यामधील काही अधिकारी चुकीच्या पद्धतीने काम करण्याचा पद्धतीमुळे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार फोफावत आहे. नोंदणी महानिरीक्षक अथवा मंत्रालयातील सचिव, उपसचिव यांच्याकडून दखल घेतली जात नाही. वरिष्ठांकडूनही या सर्व भ्रष्टाचाराला मोकळीक व मूक संमती दिली आहे की काय? असा प्रश्न पडतो.

पुणे येथील बोगस एनए ऑर्डर, बोगस भोगवटा प्रमाणपत्रे असताना नोंदलेल्या दस्ताच्या पुराव्यासह तक्रारी दिल्या होत्या. मात्र, अर्थपूर्ण व्यवहार झालेले असल्याने दुय्यम निबंधक व सहजिल्हा निबंधक यांनी हा घोटाळा पैसे घेऊन दडपला आहे. या प्रकरणाचा तपास भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे देणे आवश्यक असताना संबंधित निबंधकांनी ही प्रकरणे दाबली आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Radhakrishna Vikhe Patil-Rohan Suravse
Rohit Pawar Secret Blast : पक्षप्रवेशासाठी 'विठ्ठल' बंद पाडण्याची अट घालणारा पुढारी कोण? रोहित पवारांच्या आरोपाने खळबळ

या सर्व प्रकरणाची चौकशी महसूलमंत्री यांनी स्वतः लक्ष घालून स्वतंत्र पथकामार्फत करावी, अशी मागणी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झालेल्या व्हिडीओत मांडलेल्या मुद्द्यांची चौकशी करून त्याची सत्यता तपासावी, अशी मागणीही युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. महसूलमंत्री विखे-पाटील यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले.

R...

Radhakrishna Vikhe Patil-Rohan Suravse
Aaditya Thackeray News : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार येणे का गरजेचे?; आदित्य ठाकरेंनी सांगितले कारण....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com