Daund News: पराभव जिव्हारी लागला; ग्रामपंचायतीच्या पराभूत उमेदवारांकडून वाटप केलेल्या पैशांची वसुली सुरू!

धनदांडगे उमेदवार रिंगणात असतानाही सर्वसामान्य कार्यकर्त्याने बाजी मारली.
Gram Panchayat Election
Gram Panchayat ElectionSarkarnama

यवत (जि. पुणे) : दौंड (Daund) तालुक्यात ग्रामपंचायत (Gram Panchayat) निवडणुकांचा (Election) धुरळा खाली बसतो ना बसतो तोच पराभूत (Defeat) उमेदवारांकडून (candidate) निवडणूकीत वाटलेल्या पैशांची (Money) वसुली सुरू झाल्याची चर्चा आहे. कोणाचे बांदाचे वाद वाढले, कोणी पाणी अडविले, कोणी पाईपलाईन तोडली, तर कोणी रस्ता अडवला. अशा अनेक तक्रारींची चर्चा सुरू आहे. मात्र, दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील एका गावात एकमेकांविरूद्ध लढलेल्या आणि पराभूत झालेल्या उमेदवारांनी वाटलेल्या पैशांची वसुली करण्यासाठी युती केली आहे, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. (Defeated candidates have started recovering the allotted money)

दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील एका गावात चौरंगी लढत झाली. धनदांडगे उमेदवार रिंगणात असतानाही सर्वसामान्य कार्यकर्त्याने बाजी मारली. हा पराजय जिव्हारी लागल्याने निवडणुकीत एकामेकांविरूद्ध उभ्या ठाकलेल्या दोघा पराभूत उमेदवारांनी वाटलेल्या पैशाची वसुली करण्यासाठी युती केली आहे. रात्रीच्या वेळी हे दोघे आपल्या मोजक्या कार्यकर्त्यांसह एकेका मतदाराच्या घरात जाऊन जाब विचारत आहेत.

Gram Panchayat Election
मुंडेंशी वाद झालेल्या राजकारण्यांचे पुढे काय झाले? साबणेंपासून सुरू झालेला सिलसिला सावंतांपर्यंत पोचतो...

‘आमच्यापैकी नेमके कोणाला मत दिले, ते स्पष्ट सांगा,’ अशी दमबाजी ते करत आहेत, त्यामुळे मायबाप मतदारांपुढे चांगलाच पेच उभा राहिला आहे. या दोघांकडूनही ज्यांनी पैसे घेतले, त्यांची तर मोठी पंचाईत झाली. मत कोणाला दिले, हे सांगणे भाग होते. दोघांपैकी एकाचे नाव घेतले, तर दुसरा लगेच म्हणायचा टाक माझे घेतलेले पैसे. कबुली जबाबानंतर पैसे देण्याशिवाय पर्याय नसायचा. नाही म्हणावे, तर तगडे कार्यकर्ते सोबत होतेच. पैसे दिल्याशिवाय पर्याय नसायचा.

Gram Panchayat Election
केसरकरांचा निर्णय सावंतवाडीकरांना रूचला नाही : ग्रामपंचायत निवडणुकीत पानिपत; शिवसेनेची ताकद कायम

काही मतदारांनी आम्ही घरातील चार मते दोघांना दोन दोन दिली, असे सांगू लागले. तर न दिलेल्या मतांच्या घेतलेल्या पैशांची वसुली होऊ लागली. काहींनी पैसे खर्च केल्याने ते नाही असे सांगताच त्यांना दमबाजी, मारहाण होऊ लागली आहे. गावात बराच वेळ चाललेला हा गोंधळ पाहून कोणीतरी यवत पोलिसांना खबर दिली. पोलिसही घटनास्थळी आले. त्यांनी पोलिसी खाक्या दाखवत झालेली गर्दी पांगवली. झाल्या प्रकाराची चौकशीही केली. मात्र, सर्वच चोरीचा मामला. तक्रार करणार कोण, जो करेल तो आपल्या (निवडणुकीत पैसे घेतल्याच्या) गुन्ह्याचीच कबुली देणार होता. त्यामुळे तक्रार करण्यास कोणी पुढे आले नाही. त्यामुळे पोलिसांचेही काम सोपे झाले. ‘ना तक्रार, ना कारवाई’ या तत्वावर पोलिसांनीही आपला मोर्चा माघारी फिरवला.

Gram Panchayat Election
भोरच्या म्हाकोशीत ‘नोटा’ला सर्वाधिक मते; पण, कोणत्या उमेदवारांना विजयी घोषित केले पहा?

किरकोळ वादावादी झाली होती. पैशांच्या देवघेवीबाबत काही सांगता येणार नाही. तशी कोणाची तक्रारही नाही, असे सांगत पोलिसांनी काही घडलेच नाही, म्हणत झाल्या प्रकारावर पडदा टाकला. असे असले तरी ही ‘वसुली मोहीम’ पुन्हा सुरू होणार नाही याची काळजी पोलिस घेतील, अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com