बारामतीत फौजदाराच्या करामतींची चर्चा; तक्रारदारालाच हातपाय तोडण्याची धमकी

या प्रकरणाचा तपास संबंधित फौजदाराकडे होता.
Police logou
Police logouSarkarnama
Published on
Updated on

बारामती : कौटुंबिक वादानंतर पोलिसांकडे (Police) दाद मागण्यासाठी आलेल्या एका तक्रारदार महिलेशी फौजदाराने संबंध प्रस्थापित केल्याचा आरोपकरत त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी महिलेच्या पतीने केली आहे. बारामती (Baramati) तालुक्यात प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे. पोलिस अधीक्षकांकडे संबंधित पतीने दाद मागितली असून या बाबत सध्या चौकशी सुरु असल्याचे प्रशासनाने सांगितले.

Police logou
अजित पवारांचे धक्कातंत्र : काकडे, जगतापांच्या कार्यकर्त्यांना दिली प्रथम संधी!

या संदर्भात दाखल तक्रार अर्जामध्ये पतीने नमूद केले आहे की, पत्नी व नातेवाईकांमध्ये जून 2021 मध्ये वाद निर्माण झाला होता. या प्रकरणाचा तपास संबंधित फौजदाराकडे होता. हा वाद तडजोडीने संपुष्टात आल्यानंतर फौजदाराने पत्नीचा मोबाईल क्रमांक घेऊन त्यावरुन संभाषण सुरु केले. पत्नीला एमपीएससी (MPSC) करायचे होते, त्या साठी सगळी मदत करण्याची ग्वाही या फौजदाराने दिली.

पुण्यातील एका नातेवाईकाच्या घरी संबंधित महिलेच्या निवासाचीही व्यवस्थाही या फौजदाराने केली. पत्नी व फौजदार यांच्यात काहीतरी वेगळेच सुरु असल्याचा संशय आल्यानंतर संबंधीत महिलेच्या पतीने पोलिसात धाव घेतली. त्या नंतर फौजदाराने पतीला फोनवरुन हातपाय तोडायची धमकी देत, त्याच्या पत्नीला आपल्या व्यवसायात दहा टक्के भागीदार करुन घेणार असल्याचे सांगितले. पत्नीने हातावर संबंधित फौजदाराच्या नावाचा टॅटूही काढल्याचा आरोप, तक्रार अर्जात केला आहे. फौजदार असल्याने आपल्या जिवाला धोका असून पोलिस या प्रकरणात आपल्याला दमदाटी करत असल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

Police logou
टिपू सुलतानवरून अकोल्यातही तापले राजकारण, भाजप अध्यक्षावर कॉंग्रेस व सेनेचा रोष...

दरम्यान, या प्रकरणात तक्रार अर्ज प्राप्त झाला असून चौकशी सुरु आहे, चौकशीनंतर पोलिस अधीक्षकांना या बाबतचा अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली आहे. संबंधित फौजदार तक्रारदार पतीस फोनवरुन हातपाय तोडण्याची धमकी देत असल्याची व पत्नीला दहा टक्के भागीदार करणार असल्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com