पवार कुटुंबीयांच्या दिवाळी पाडवा कार्यक्रमाला अजितदादा अनुपस्थित; हे आहे कारण

पवार कुटुंबीय अप्पासाहेब पवार ऑडिटोरिअममध्ये शुभेच्छुकांना भेटत आहेत.
Ajit Pawar
Ajit Pawar

बारामती : दिवाळी पाडव्याला (Diwali) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) व कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठी लोक दरवर्षी आवर्जून बारामतीला येतात. महाराष्ट्रभरातून पक्षाचे कार्यकर्ते, नेत्यांची रीघ लागलेले असते. यंदाही पवार कुटुंबीय लोकांना भेटत आहेत. पण यावर्षी अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित नाहीत.

यंदा कोरोना स्थिती विचारात घेत सोशल डिस्टन्सिंग हेतूने पवार कुटुंबीय आज गोविंदबागऐवजी लगतच्या अप्पासाहेब पवार ऑडिटोरिअममध्ये शुभेच्छुकांना भेटत आहेत. यावेळी शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित नसल्याबद्दल त्यांना विचारण्यात आले. ते म्हणाले, अजित पवारांचे दोन चालक व तीन कर्मचाऱ्यांना कोरोना निदान झाले आहे. अजित पवारांचीही सकाळीच चाचणी केली आहे. अद्याप त्याचा अहवाल आला नसल्याने त्यांना कार्यक्रमाला न येण्यास सांगितले आहे.

Ajit Pawar
न्यायालयाच्या निर्णयामुळे आर्यन खानचा पाडवा वानखेडेंसोबत होणार साजरा

कोरोना काळात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांचे कौतुक करत पवार म्हणाले, याकाळात राज्य सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. यंदा लोकांना भेटावे की नको, अशी चर्चा सुरू होती. पण लोकांकडूनच विनंती आली की, कोरोनाचे नियम पाळून लोक भेटतील. या भेटीचा आनंद घेता आला पाहिजे. आज शिस्तीने लोक येत आहे. लोक पूर्ण खबरदारी घेत असून सहकार्य करून शुभेच्छा देत आहेत.

हे वर्ष संकटाचे असून आपण यातून बाहेर पडण्यासाठी नेहमीचे कामकाज योग्यप्रकारे करू. अनेक दृष्टीने आर्थिक नुकसान झाले असून पुन्हा एकदा ते सावरण्याची आपण काळजी घेऊ. राज्यातील व देशातील जनतेला पाडव्याच्या शुभेच्छा देतो. नव्या दमाने पुन्हा एकदा कामाला लागुयात, असं आवाहनही पवारांनी केलं.

Ajit Pawar
तुम्हाला एलपीजी सबसिडी मिळणार का? मोदी सरकार घेणार मोठा निर्णय

एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत बोलताना पवार म्हणाले, एसटी संघटनांशी संबंधित काही लोक मला भेटले. आम्हाला हा संप पुढे न्यायचा नाही. एसटी संकटात आहे, हे माहिती आहे. पण दिवाळीच्या काळात लोकांना त्रास होऊ नये, असं आमचं मत आहे. काही लोकांची टोकाची भूमिका घेतल्याने हे घडत आहे, असं त्यांनी सांगितल्याचे पवार म्हणाले. जवळपास 80 ते 85 टक्के गाड्या मार्गावर आहेत केवळ 15 ते 20 टक्के अडचण आहे. संस्थेच्या हितासाठी हे फारसे ताणणे योग्य होणार नाही. न्यायालयानेही हा संप योग्य नसल्याचे म्हटले आहे. कर्मचाऱ्यांनी न्यायालयाचाही आदर ठेवावा, असं आवाहन पवार यांनी केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com