न्यायालयाच्या निर्णयामुळे आर्यन खानचा पाडवा वानखेडेंसोबत होणार साजरा

आर्यनला आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे.
Aryan Khan
Aryan Khansarkarnama

मुंबई : मुंबई: किंगखान शाहरुख खानचा (Shahrukh khan) मुलगा आणि ड्रग्ज पार्टीतील संशयीत आरोपी आर्यन खान (Aryan khan) सध्या जामिनावर बाहेर आहे. त्यामुळे त्याची दिवाळी कुटुंबीयांसोबत साजरी होवू शकली आहे. पण न्यायायलयाच्या निर्णयामुळे त्याचा आजचा पाडवा मात्र एनसीबीच्या ऑफिसमध्ये विभागीय संचालक समीर वानखेडेंसोबत साजरा होणार आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी (Drugs party) प्रकरणी आर्यनला आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानला अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. त्यानुसार त्याला प्रत्येक शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मुंबईतील एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. आर्यन खान ३० ऑक्टोबर रोजी आर्थर रोड कारागृहातुन बाहेर आला होता. २ ऑक्टोबरला एनसीबीने कॉर्डेलिया क्रूझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर समीर वानखेडेंच्या नेतृत्वात छापा मारला होता. यावेळी काही जणांकडे ड्रग्ज आढळल्याचा एनसीबीचा दावा आहे. याच प्रकरणात त्यावेळी आर्यनसह ८ जणांना अटक करण्यात आली होती. पुढे तब्बल २७ दिवसानंतर आर्यनची आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली होती.

Aryan Khan
आर्यन खानच्या पाठीराख्यांनो, "थोडी तो भी शर्म करो"

बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला आर्यन खानसाठी जामीनदार राहिली आहे. आर्यन खानला जामीन देताना न्यायालयाने १४ प्रकारच्या अटी आणि शर्ती ठेवल्या आहेत. यात असा गुन्हा परत करु नये, इतर आरोपींशी बोलू नये, साक्षीरांवर प्रभाव टाकू नये, देश सोडून जावू नये अशा अटी टाकण्यात आल्या. त्यामुळे त्याचा पासपोर्ट देखील विषेश न्यायालयाकडे जमा करावा लागणार आहे.

Aryan Khan
अखेर मुकुल रोहतगींनी आर्यनला जामीन मिळवून दिलाच!

तसेच आरोपीला तपास अधिकाऱ्यांना न सांगता मुंबईबाहेर जाता येणार नाही. तसेच माध्यमांशी बोलण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. प्रत्येक शुक्रवारी 11 ते 2 वेळात एनसीबी ऑफिसमध्ये हजर राहावे लागणार आहे. प्रत्येक सुनावणीला वेळेत हजर राहण्याचे आणि पुराव्यांशी छेडछाड न करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com