Ajit Pawar, Sharad Pawar
Ajit Pawar, Sharad PawarSarkarnama

Sharad Pawar Vs Ajit Pawar : ठरलं... 20 हजार जणांच्या उपस्थितीत, अजितदादांचे 40 नेते शरद पवारांच्या गटात, या तारखेला होणार प्रवेश!

NCP Sharadchandra Pawar Party : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. 20 जुलैच्या या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
Published on

Pune News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यावर आली आहे.त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून नेते आपल्यासाठी सोयीची राजकीय वाट निवडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राहिलेले अनेक समर्थक लोकसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या परफॉर्मन्स नंतर शरद पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेताना दिसत आहेत.

लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठे यश मिळालं. त्यांचा स्ट्राइक रेट 80 टक्केचा राहिला.यानंतर शरद पवार यांची भेट घेऊन अनेक नेतेमंडळी पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. रोज किमान दोन तास शरद पवार यांना पक्ष प्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या भेटीगाठीसाठी काढावे लागत असल्याचं खुद्द शरद पवार यांनी सांगितले आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar
Rohit Pawar Predictions : आगे आगे देखो होता है क्या'; पिंपरी, भोसरीतील राजकीय उलथापालथीचे रोहित पवारांकडून संकेत

काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड मधून मोठ्या संख्येने माजी नगरसेवकांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्याचे पहायला मिळाले होती. त्यामुळे पिंपरी चिंचवड मधून मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला खिंडार पडणार हे जवळपास निश्चित झालं होतं.

पिंपरी चिंचवड हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. याच पिंपरी चिंचवड मधून अजितदादां सोबत असलेले 40 नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी 20 जुलैची तारीख निश्चित करण्यात आली आहे. अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या पक्षप्रवेशामुळे शरद पवार गटाची ताकद वाढणार आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar
Sharad Pawar News : ...म्हणून CM शिंदेंनी आरक्षणाबाबत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला जाता आलं नाही! शरद पवारांचा खुलासा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन देखील केले जाणार आहे. 20 जुलैच्या या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून 20 हजार कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ही सभा होणार असल्याचं पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला मिळालेल्या यशानंतर त्यांच्याकडे जाणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची संख्या वाढत असल्याने त्याचा फटका विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेलला बसण्याची शक्यता यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com